हरिद्वार येथे १० वीच्या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला
कपड्यांना इस्त्री करताना विद्युत बिघाडामुळे अपघात घडल्याची शक्यता
कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला
Uttarakhand 10th Class Student Death News सगळीकडेच सध्या परीक्षेचं वातावरण आहे. अशातच उत्तराखंडमध्ये १० वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेला जाण्यापूर्वी कपड्यांना इस्त्री करताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सिडकुल पोलिस स्टेशन हद्दीतील रावली महदूद गावात सदर घटना घडली आहे. रोहन (बदलेलं नाव) हा १० वीत शिकत असून तो बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता. घटनेच्या दिवशी तो पेपरला जाण्यासाठी निघाला होता. निघण्यापूर्वी सगळं आवरून तो शाळेच्या कपड्यांना इस्त्री करत होता.
यादरम्यान इस्त्रीचा शॉक लागून तो जागीच बेशुद्ध पडला. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिडकुल पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, इस्त्री करताना विद्युत तार किंवा उपकरणात बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असावा. तथापि, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.