Dombivli : डोंबिवलीतील 'त्या' विद्यार्थिनीच्या खात्यात २ कोटी ६० हजार; उल्हासनगर ते उत्तराखंड कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

Dombivli Bank Money Fraud Uttarakhand Connection : डोंबिवलीतील विद्यार्थिनीच्या बँक खात्यात अचानक २ कोटी ६० लाख रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. सायबर फसवणुकीचा संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Dombivli Bank Money Fraud Uttarakhand Connection
Dombivli Bank Money Fraud Uttarakhand ConnectionSaam Tv
Published On
Summary
  • विद्यार्थिनीच्या खात्यात अचानक २.६० कोटी रुपयांचे व्यवहार

  • मैत्रिणीने खाते उघडून दिल्यानंतर व्यवहार उघडकीस

  • उत्तराखंड फसवणूक प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

  • तीन महिन्यांपासून पाठपुरावा; मनसेने कारवाईची मागणी केली

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

भगवान देता है, तो छप्पर फाडके! अशीच काहीशी घटना डोंबिवलीत घडली आहे. एका तरुणीच्या बँक खात्यात शंभर दोनशे नाही, तर तब्बल २ कोटी ६० लाख रुपये आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीने माझ्या अकाऊंटमध्ये २ कोटी ६० लाख रुपये कसे आले? याचा सखोल तपास करा, अशी मागणी करत तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र तक्रारीनंतरही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे.

तक्रारदार निधी तिवारी डोंबिवलीच्या गोग्रासवाडी परिसरात राहते. सध्या ती महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चांदनी सिंह हिने बँकेत अकाऊंट उघडण्याचे टार्गेट असल्याचे सांगत निधीचे खाते उघडून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी निधीच्या खात्यात तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. याशिवाय अन्य एका खात्यात सुमारे १० लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहितीही मिळाली. या व्यवहारांबाबत निधीने चांदनीकडे विचारणा केली असता तिने टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. पुढील चौकशीत उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक करून ते पैसे तिच्या खात्यात वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात उल्हासनगरमधील एका व्यक्तीचाही सहभाग असल्याची माहिती निधीने पोलिसांना दिली असल्याचे सांगितले जाते.

Dombivli Bank Money Fraud Uttarakhand Connection
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

गेल्या तीन महिन्यांपासून निधी पोलिसांकडे पाठपुरावा करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही,असे पोलिसांचे म्हणणे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणाबाबत मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात विद्यार्थिनीच्या खात्याचा गैरवापर होतो आणि पोलिस दखल घेत नाहीत, हे गंभीर आहे, असे ते म्हणाले.

Dombivli Bank Money Fraud Uttarakhand Connection
Malad Fruit Seller : फळांना लावलं जातंय उंदीर मारण्याचं औषध, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; संतापजनक Video व्हायरल

संबंधित संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतल्याचे समजते; मात्र पुढील कारवाई का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्याशी संपर्क साधला असता, तरुणीचा अर्ज प्राप्त झाला असून चौकशी सुरू आहे,अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई होणार का, तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com