Rule Change: LPG गॅस, सिगारेट ते बँका; १ फेब्रुवारीपासून या नियमात होणार बदल

Rule Change From 1st February 2026: १ फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहे. १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधीच अनेक नियम बदलणार आहेत.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

१ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

१ फेब्रुवारीपासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

जानेवारी महिना संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिना सुरु होईल. फेब्रुवारी महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. यानंतर देशातील अनेक गोष्टी बदलणार आहेत. दरम्यान, त्याआधी काही नियमात बदल केले आहेत. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहे. त्याचसोबत तंबाखूजन्य पदार्थ महाग होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Rule Change
EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार

LPG गॅसच्या किंमती

दर महिन्याच्या १ तारखेपासून एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. १ फेब्रुवारी रोजीदेखील सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर होणार आहे. पुढच्या महिन्यात बजेट सादर होणार असल्याने किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

पान सिगारेटच्या किंमती

पान मसाला, सिगारेटच्या किंमतीत वाढ होणार आहे. १ फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक कर लावण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तंबाखू, पान मसाला पदार्थांवर नवीन शुल्क आकारले जाणार आहे. पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लावण्यात येणार आहे.

Rule Change
EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

FASTag च्या नियमात बदल

FASTag च्याही नियमात बदल झाले आहेत. आता फास्टॅग व्हेरिफिकेशनसाठी सक्ती नसणार आहे. याआधी वाहनाची KYV करणे गरजेचे होते. आता कार, जीप, व्हॅनसाठी व्हेरिफिकेशन करणे सक्तीचे नसणार आहे. बँकाच वाहनांच व्हेरिफिकेशन करणार आहे.

बँकांच्या सुट्ट्या

फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि सणासुदीच्या दिवशी सुट्ट्या असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सुट्टी असणार आहे.

Rule Change
Traffic Rules: नियम मोडाल तर गाडी गमवाल, अपघात रोखण्यासाठी नवा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com