

सध्या कामाच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे खाण्यापिण्याच्या किंवा रोजच्या जीवनशैलीत बदल होत असतात. काहीजण कामानिमित्त तासंतास बाहेर फिरत असतात. काहींना दिवसरात्र लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसावं लागतं. पण सध्या सगळ्यांना लक्झरी लाइफ हवी असल्यामुळे लोक मेहनत करायला मागे हटत नाहीत. पण याने स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचं असतं. त्यासाठी तरुण मंडळी किंवा तिशी-चाळीशीतली मंडळी डाएट, जीम, योगा, हेल्दी खाणं, जंक फूड टाळणं, स्कीन केअर, हेअर केअर यागोष्टींकडे लक्ष देऊन उत्तम जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करतात. तरीही काहींना भविष्यात जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतं.
पुढे आपण डॉक्टरांनी सांगितलेली आणि तरुणांना थक्क करणारी एका रुग्णाची गोष्ट जाणून घेणार आहोत. त्यातून फीट राहणाऱ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याचा तुम्हाला अंदाज येईल. अर्थात कोणतंही डाएट किंवा रोजच्या सवयींमध्ये मोठे बदल करण्यापुर्वी तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं आहे.
हृदयविकार (Heart attacks) या आजाराने सगळ्यात जास्त रुग्ण आजही मृत्यूला सामोरे जात आहेत. WHOच्या मते हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात तर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण फार वेगाने वाढत आहे. अनेकांना वाटतं की चुकीची जीवनशैली, व्यसनं किंवा जंक फूडमुळेच हृदयविकार होतो. पण दिल्लीतीतले तज्ज्ञ डॉ. जुबैर अहमद यांनी शेअर केलेल्या एका प्रकरणामुळे ही समजूत पूर्णपणे चुकीची ठरते.
डॉ. अहमद यांनी सोशल मीडियावर बंगळुरूतील 37 वर्षांच्या एका तरुणाचा अनुभव सांगितला आहे. हा तरुण रोज सकाळी पाच किलोमीटर धावायला जायचा, जंक फूड टाळत होता, सिगारेट आणि दारुचे सेवन करत नव्हता, वेळेवर झोप घेत होता आणि दिवसभर हेल्दी आणि परफेक्ट लाइफस्टाइल जगत होता. तरीही काही दिवसांपूर्वी त्याला छातीत खूप दुखायला लागलं आणि डाव्या हातात जडपणा जाणवत होता. तपासणीसाठी त्याला कार्डियाक कॅथेटरायझेशन लॅबमध्ये नेण्यात आलं. अँजिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या हृदयातील दोन महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज आढळले आणि त्यामुळे लगेचच त्याला दोन स्टेंट्स बसवावे लागले.
हृदयविकारामागे फक्त व्यायाम किंवा खाण्यापिण्याच्या सवयी जबाबदार नसतात. अनेक लपलेली कारणं असतात, जी बहुतेक लोक तपासतच नाहीत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आनुवंशिकता. जर वडील, काका किंवा जवळच्या नात्यात कुणाला कमी वयात हृदयविकार झाला असेल, तर फिट आणि सडपातळ असूनही धोका दोन ते तीन पट वाढू शकतो. एका विशिष्ठ प्रकारचा कोलेस्टेरॉलही वाढतो. जो साध्या लिपिड प्रोफाइल चाचणीत दिसत नाही. हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू ब्लॉकेज निर्माण करू शकतो, जरी इतर कोलेस्टेरॉल रिपोर्ट नॉर्मल असले तरीही.
अनेक लोकांना झोपेचं महत्त्वही कळत नाही. उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणे, अनियमित झोपेची वेळ, कमी झोप यामुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात. यामुळे रक्त घट्ट होऊ शकतं, प्लॅक अस्थिर होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. फक्त जिम, रनिंग किंवा फिट बॉडी म्हणजे हृदय निरोगी असंच नाही. हृदयाचं आरोग्य हे जनुकीय घटक, ताण, झोप, सूज, हार्मोन्स आणि काही खास रक्ततपासण्यांवर अवलंबून असतं. म्हणूनच 25 वर्षांवरील भारतीयांनी आणि ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, त्यांनी वेळेवर महत्वाच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. योग्य वेळी धोका ओळखला तर मोठा हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो. हा प्रकार एकच गोष्ट शिकवतो फक्त फिट दिसणं पुरेसं नाही. आतून हृदय किती निरोगी आहे, हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.