preventive health checkup
Medical Tests For MenGOOGLE

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

Medical Tests For Men: ४० वर्षांनंतर पुरुषांनी रक्तदाब, डायबेटीज, प्रोस्टेट आणि लिव्हर-किडनी तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. वेळेवर तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात.
Published on

प्रत्येक माणसाला ताच्या वाढत्या वयानुसार काही समस्यांना सामोरं जावं लागतं. तरुणपणी लोक बरेच कष्ट करतात. त्याने शरीर थकतं. सध्या लोक दिवसरात्र मेहनत घेऊन एक चांगली लाइफस्टाइल जगण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी मेहनत घेताना काही सामान्य वाटणाऱ्या समस्यांकडे लोक दुर्लक्ष करतात आणि निघून जातात. पुढे भविष्यात त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. पुढे आपण वयाच्या चाळीशीत गेल्यावर कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत? आणि त्याने भविष्यात कसा फायदा होईल? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आजही अनेक पुरुष आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अनियमित आहार यामुळे भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ४० वर्षांनंतर काही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या नियमितपणे करणे अत्यंत गरजेचे ठरते. चाळीशीनंतर उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्यपणे दिसून येते. यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक वाढू शकतो. त्यामुळे दरवर्षी रक्तदाब तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोलेस्ट्रॉलची तपासणी करणं गरडजेचं आहे. जर ही पातळी नियंत्रणाबाहेर असेल तर वेळीच उपचार सुरू केले पाहिजेत.

preventive health checkup
Colorectal Cancer ठरतोय ५० वर्षांखालील पुरुषांचा मृत्यूचं कारण; वेळीच लक्षणे घ्या जाणून; अमेरिकेतील तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

याच वयात डायबेटीजचा धोका सुद्धा वाढतो. भारतात डायबेटीजचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ४० नंतर रक्तातील साखरेची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. HbA1c चाचणीच्या मदतीने मागील तीन महिन्यांतल्या रक्तातल्या साखरेची सरासरी पातळी समजते, त्यामुळे डायबेटीज लवकर ओळखता येतो.

पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्या चाळीशीनंतर वाढायला सुरुवात होते. प्रोस्टेट कॅन्सर किंवा प्रोस्टेट वाढ यासारखे आजार सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास उपचार जास्त प्रभावी ठरतात. यासाठी PSA चाचणी आणि डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, लिव्हर आणि किडनीच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ४० नंतर फॅटी लिव्हर, किडनीचे आजार यांसारख्या समस्या उद्भवतात. यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट केली जाते.

तज्ज्ञांच्या मते, नियमित आरोग्य तपासणी ही आजारांपासून बचावाची पहिली पायरी आहे. लक्षणं दिसण्याची वाट न पाहता वेळेवर तपासणी केली तर आरोग्य दीर्घकाळ चांगलं ठेवता येतं. त्यामुळे ४० वर्षांनंतर पुरुषांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे.

टीप: हा लेख वैद्यकीय अहवालांवर आधारित असून केवळ माहिती आणि जनजागृतीसाठी आहे. कोणतीही तपासणी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

preventive health checkup
Shahid Kapoor Fitness Secret: ''घरचं खा अन् फीट राहा'' शाहिद कपूरने सांगितलं त्याचं डाएटचं सिक्रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com