Heart Attack: भारतामध्ये 99% वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; वाचा मूळ कारण अन् धोके

Heart Attack Risk in India: बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात हार्ट अटॅकचा धोका झपाट्याने वाढतोय. कारणे, लपलेले धोके आणि हृदयविकार टाळण्यासाठी आवश्यक उपाय जाणून घ्या.
heart attack causes
Heart Attack:google
Published On

भारतामध्ये हार्ट अटॅक हे मृत्यूचं प्रमुख कारण बनत चाललं आहे. देशात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्याचं कारण म्हणजे माणसाची बदलेली लाइफस्टाईल आहे. धकाधकीच्या जीवनात शरीराच्या सामान्य वाटणाऱ्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम हा हार्ट अटॅकने दिसतो. म्हणूनच आपण यावर हलक्या रोजच्या किंवा सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं टाळलं पाहिजे. पुढील बातमीत आपण हृदयविकार वाढण्याचं कारण, शरीरावर होणारा परिणाम आणि यावर काही उपाय जाणून घेणार आहोत.

हृदयविकार का वाढतोय?

सध्या लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये खूप बदल होत आहेत. व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप न झाल्याने शरीरातल्या या समस्या वाढत जात आहेत. त्यात जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे सेवन वाढलेले सेवन आणि त्यामुळे शरीरात वाढणारा फॅट याला कारणीभूत आहे.

तसेच ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याला हा धोका जास्त असतो. कारण याने धमन्यांचे नुकसान होत असतं. वाढलेले कोलेस्टेरॉल, मधुमेह, धूम्रपान या सगळ्या सवयींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

heart attack causes
Sunday Horoscope: येणारी संधी सोडू नका, या ५ राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार; वाचा रविवारचे खास राशीभविष्य

हार्ट अटॅक कसा येतो?

हार्ट अटॅक येण्यापुर्वी शरीरात अनेक बदल होतात. त्यामध्ये सगळ्यात आधी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये गाठी तयार होतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. मग हृदयाच्या स्नायूंनपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. ही समस्या जर वेळेवर बरी केली नाही तर हृदयाचं कायमचं नुकसान होतं आणि याचा शेवट मृत्यूने होतो.

धोकादायक बाब काय आहे?

हार्ट अटॅक हा अचानक येत नाही. अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न देता तो शरीरात वाढत राहतो. अनेकजण स्वतःला निरोगी समजतात. मग अचानक छातीत कळा येतात. आणि हार्ट अटॅक येतो. हे धोके मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

फळे, भाज्या, संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा, धूम्रपान पूर्णपणे टाळा, तणाव कमी करा, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करा.

वयाच्या 30 वर्षांनंतर नियमित आरोग्याची तपासणी करा. कुटुंबात कोणाला हार्टचा त्रास असेल तर जास्त सतर्क राहा. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी धोके ओळखून जीवनशैलीत बदल आणि आवश्यक उपचार केल्याने भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

heart attack causes
Chanakya Niti: तोंडावर गोड बोलणारे विषारी लोक ओळखण्यासाठी ३ सोपे मार्ग, वेळीच व्हा सावध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com