

LPG Price 1 January 2026 : सरत्या वर्षाला निरोप देत सर्वांनी २०२६ या नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केले. पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना जोरदार धक्का बसलाय. होय, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली ते मुंबई आणि पुणे ते कोलकाता सर्व शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १११ रूपायंची वाढ झाली आहे. दिलासादायक म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, दर जैसे थे आहेत.
इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर १६९१.५० रुपयांना मिळेल. डिसेंबर २०२५ मध्ये या गॅस सिलिंडरची किंमत १५८०.५० रुपये इतकी होती. कोलकातामध्ये गॅस सिलिंडर १७९५ रुपयांना मिळेल. मुंबईत आजपासून व्यावसायिक सिलिंडर १५३१.५० रुपयांऐवजी १६४२.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४९.५० रुपयांना मिळेल.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर काय ?
व्यासायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली, त्याचा फटका हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना बसणार आहे. पण दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर राजधानी दिल्लीत ₹८५३, मुंबईत ₹८५२.५० आणि लखनौमध्ये ₹८९०.५० ला मिळत आहे.
२०२५ मध्ये सिलिंडर दहा वेळा झाला स्वस्त -
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये मागील वर्षभरात मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या १२ महिन्यांत (जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५), दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या मेट्रो शहरात प्रति सिलिंडरच्या किमती सरासरी २३८ रुपयांनी कमी झाल्या. २०२५ मध्ये १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर १० वेळा स्वस्त झाले. जुलै (₹५८.५०), सप्टेंबर (₹५१.५०) आणि एप्रिल (₹४१+) मध्ये सर्वात मोठी कपात झाली. पण मार्च-ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे १५.५० आणि ६ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.
कोणत्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त -
जानेवारी २०२५ (₹१४.५०-१६)
फेब्रुवारी (₹४-७)
एप्रिल (₹४१-४४.५०)
मे (₹१४.५०-१७)
जून (₹२४-२५.५०)
जुलै (₹५७-५८.५०)
ऑगस्ट (₹३३.५०-३४.५०)
सप्टेंबर (₹५०.५०-५१.५०)
नोव्हेंबर (₹४.५०-६.५०)
डिसेंबर २०२५ (₹१०-१०.५०).
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.