Train Accident : काळ आला होता, पण... बोगद्यात २ रेल्वेची जोरात धडक, ६० जण गंभीर जखमी

Chamoli train accident today : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपलकोटी बोगद्यात लोको ट्रेन आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात सुमारे ६० कामगार जखमी झाले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
Chamoli tunnel train collision Uttarakhand
Chamoli tunnel train collision UttarakhandSaam tv
Published On

Uttarakhand Chamoli Train Accident : मजूरांना घेऊन जाणारी लोको ट्रोनने बोगद्यात मालगाडीला जोरात धडक दिल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. चमोली जिल्ह्यातील विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या पिपलकोटी बोगद्यात मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामध्ये ५० कामगार जखमी झाले आहेत.

मंगळवारी संध्याकाळी लोको ट्रेन कामगार आणि अधिकाऱ्यांना पिपलकोटी बोगद्यात घेऊन निघाली होती. त्याचवेळी मालगाडीला जोरात धडकली. त्यामुळे ६० जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मजूरांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Chamoli tunnel train collision Uttarakhand
शिंदेंना ठाण्यात जबरी धक्का, उमदेवारी अर्ज भरण्याआधी ४ माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

चमोलीमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या अपघातावेळी ट्रेनमध्ये एकूण १०९ लोक होते. त्यापैकी ६० जण जखमी झाले आहेत. सर्व लोकांना वाचवण्यात आले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती चमोलीमधील जिल्हा अधिकारी गौरव कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Chamoli tunnel train collision Uttarakhand
Municipal Election : दुर्दैवी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मृत्यू, अर्ज दाखल करून ऑफिस बाहेर आले अन्....

टीएचडीसीद्वारे बांधलेल्या प्रकल्पाच्या पिपलकोटी बोगद्यात एक ट्रेन प्रवाशांना घेऊन जात होती. दुसऱ्या बाजूला मालगाडी येत होती. त्यावेळी या दोन्ही ट्रेनची धडक झाली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कामगार, अधिकारी आणि बांधकाम कामासाठी लागणारे साहित्य वाहून नेण्यासाठी बोगद्यांच्या आत लोको ट्रेनचा वापर केला जातो. पण मंगळवारी संध्याकाळी मालगाडीसोबत लोको ट्रेनची जोरात धडक झाली.

Chamoli tunnel train collision Uttarakhand
Municipal Election : निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रेखा चौधरींची बिनविरोध निवड

अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारासठी दाखल करण्यात आलेय. गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात ४२ जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. तर १७ जणांवर पिपलकोटी येथील विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्व जखमी कामगारांची प्रकृती स्थिर आहे. चमोली जिल्ह्यातील हेलांग आणि पिपलकोटी दरम्यान अलकनंदा नदीवर ४४४ मेगावॅटचा हा जलविद्युत प्रकल्प बांधला जात आहे. या प्रकल्पातून चार टर्बाइनद्वारे १११ मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. पुढील वर्षांपर्यंत प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे काम जोरात सुरू आहे. पण मंगळवारी सायंकाळी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Chamoli tunnel train collision Uttarakhand
जय महाराष्ट्र! तिकिट कापलं म्हणून थेट मनसेच्या ऑफिसला ठोकलं कुलूप, संतप्त होत म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com