BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

Mumbai Best Bus Accident : मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसने १३ जणांना चिरडले. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Best Bus Accident
Mumbai Best Bus AccidentSaam TV Marathi
Published On

Mumbai Bhandup Best Bus Accident death : मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर सोमवारी रात्री बेस्ट बसने १३ मुंबईकरांना चिरडले. काम संपल्यानंतर घराकडे जाण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्या मुंबईकरांवर काळाने घाला घातला. ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये ३ महिलांचा समावेश होता. मृतामध्ये २४ वर्षाच्या वर्षा सावंत यांचाही समावेश होता. त्या टाटा हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होत्या. रूग्णासाठी जिवाचे अहोरात्र झटणाऱ्या वर्षाचा मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. वर्षा सावंत भांडूपमधून घराकडे निघाल्या होत्या. पण त्याचवेळी बसने चिरडले अन् त्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील एका लग्नाहून वर्षा आली होती, ती घराकडे जात होती. पण वाटातेच काळाने गाठले. (Mumbai Bhandup BEST Bus Accident: 4 Dead Including Young Nurse, 13 Injured)

२४ वर्षांच्या वर्षा सावंत या मागील काही दिवसांपासून टाटा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. भावाच्या सुट्टीसाठी त्या सुट्टीवर होत्या. साताऱ्यातील लग्न आटोपून वर्षा सोमवार मुंबईत परतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जायचं, हा विचार वर्षाच्या मनात घोंगावत होता. त्या भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर बसच्या रांगेत उभ्या होत्या. मुलगी गावाकडून घरी येणार म्हणून कुटुंबाकडून काळजीपोटी फोन केला जात होता. पण फोन उचललाच जात नव्हता. कारण, रांगेत उभ्या असलेल्या वर्षा सावंत आणि आणखी १२ जणांना बेस्ट बसने चिरडले होते. एका अनोळखी व्यक्तीने वर्षाच्या कुटुंबियांचा फोन उचलला अन् घडलेली घटना सांगितली. वर्षाचा अपघात झालाय, हे ऐकताच बापाच्या पायाखालून वाळू सरकली. वर्षाची आई आणि बहीण सातऱ्याहून निघाले होते, ते बसमध्येच होते. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते.

Mumbai Best Bus Accident
BEST Bus Accident : बेस्ट बसने १३ मुंबईकरांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू, अपघाताचे धक्कादायक कारण समोर

अपघातानंतर वर्षाला मुलुंड येथील एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. उपचारावेळीच तिचा मृत्यू झाला. वडील, मित्र आणि नातेवाईकांनी राजावाडी रुग्णालयाच्या पोस्टमार्टम केंद्रात तिचा मृतदेह आणला, त्यावेळी तिची आई आणि धाकटी बहीण साताराहून मुंबईकडे येत होते. वर्षा सावंत यांच्या पश्चात् आई-वडील आणि दोन बहि‍णी असा परिवार आहे.

Mumbai Best Bus Accident
भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

बेस्ट अपघातात ४ जणांचा मृत्यू -

सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या आसपास भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईकर घराकडे जाण्यासाठी रांगेत उभे होते. काही दुकानाबाहेर होते. त्याचवेळी बेस्ट बस चालकाचा युटर्न चुकला अन् १३ जणांना चिरडले. यामध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. ​प्रणिता संदीप रसम (वय ३५), वर्षा सावंत (वय २५) - , मानसी मेघश्याम गुरव (वय ४९) आणि प्रशांत शिंदे (वय ५३) अशी मृताची नावे आहेत.

​जखमींची प्रकृती आणि रुग्णालयानुसार तपशील:

​एम.टी. अगरवाल रुग्णालय (स्थिर प्रकृती):

​नारायण भिकाजी कांबळे (वय ५९)

​मंगेश मुकुंद दुखंडे (वय ४५)

​ज्योती विष्णू शिर्के (वय ५५)

सायन रुग्णालय (किरकोळ दुखापत):

शितल प्रकाश हडवे (वय ३९)

​रामदास शंकर रुपे (वय ५९)

मिनाज रुग्णालय, भांडूप (खाजगी):

​दिनेश विनायक सावंत (वय ४९)

​पूर्वा संदीप रसम (वय १२)

फोर्टिस आणि हिरा मोंगी रुग्णालय:

​प्रताप गोपाळ कोरपे (वय ६०) - फोर्टिस रुग्णालय (स्थिर)

​रवींद्र सेवाराम घाडिगावकर (वय ५६) - हिरा मोंगी रुग्णालय (स्थिर)

राजावाडी रुग्णालय:

​प्रशांत दत्ताराम लाड (वय ५१) - यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध (DAMA) डिस्चार्ज घेतला आहे.

Mumbai Best Bus Accident
Municipal Election : निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रेखा चौधरींची बिनविरोध निवड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com