BEST Bus Accident : बेस्ट बसने १३ मुंबईकरांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू, अपघाताचे धक्कादायक कारण समोर

Mumbai Best Bus Accident : भांडूप रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय. यू टर्न घेताना नियंत्रण सुटून बस प्रवाशांच्या रांगेत घुसली अन् होत्याचं नव्हते झालं.
Mumbai Best Bus Accident
Mumbai Best Bus AccidentSaam TV Marathi
Published On

Mumbai Bhandup Best Bus Accident death Toll : मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय. तर ९ जण जखमी आहेत. बेस्ट बसच्या अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर चालक बेस्ट बस यू टर्न घेत होता, त्यावळीच नियंत्रण सुटले अन् बस प्रवाशाच्या रांगेत शिरली. बसने १३ जणांना चिरडले. एका क्षणात आरडाओरड अन् किंचळ्या सुरू झाल्या. कामावरून घरी परतणाऱ्यांना बेस्ट बसने चिरडल्याने दुर्घटना घडली. रात्री साडेनऊ वाजता भांडूप रेल्वे स्टेशन परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Mumbai Best Bus Accident
रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्या घरावर ड्रोन हल्ला, युद्ध पुन्हा भडकणार?

यू टर्न घेतला अन् रांगेत शिरली बस -

भांडूप रेल्वे स्थानकावर बेस्ट बसच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान हा अपघात घडला. 606 क्रमांकाची बेस्ट बस यू टर्न घेत असताना अचानक प्रवाशांच्या रांगेत शिरली. या वेळी रस्त्यावरील १३ प्रवासी हे बस खाली चिडले गेले. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Mumbai Best Bus Accident
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेस वंचितच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, जागा वाटपही ठरलं

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबात दु:ख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली. "मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल." अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Mumbai Best Bus Accident
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ, दिग्गजांना जमलं नाही ते सपकाळांनी करून दाखवलं

अपघात नेमका झाला कसा ?

सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री 9.30 च्या दरम्यान भांडूप रेल्वे स्टेशनच्या बाहेर घरी जाण्यांसाठी मुंबईकरांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी बेस्ट बसने १३ ते १४ जणांना चिरडले. ४ जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

Mumbai Best Bus Accident
मुंबईकरांसाठी खुशखबर! कल्याण-डोंबिवलीचा प्रवास सुसाट होणार, मध्य रेल्वेवर ५४८ लोकल सेवा सुरू होणार

घरी जाण्यासाठी बेस्ट बस स्थानकावर बस पकडण्यासाठी अनेक लोक रांगेत उभे होते. त्यावेळी चालक बेस्ट बस युटर्न घेत होता. तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागे रांगेत उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना चिरडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. बेस्ट अधिकारी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. संतप्त जणावाकडून चालकाला ताब्यात घेण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. पण त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली. पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. १० जखमींना राजावाडी आणि एमटी अग्रवाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

Mumbai Best Bus Accident
Sanjay Raut : शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा हात, राऊतांच्या दाव्याने देशात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com