Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेस वंचितच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, जागा वाटपही ठरलं

Congress Vanchit alliance : महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती अधिकृत झाली आहे. मुंबईसाठी जागावाटपही ठरले आहे.
Saam TV Breaking News
Saam TV Breaking NewsSaam TV Breaking News
Published On

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance Mumbai : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये युतीची घोषणा करण्यात आली. मुंबईसाठी काँग्रेस आणि वंचित यांची युती झाली आहे. युतीचे जागावाटपही फायनल झालेय. याची घोषणा करण्यात आली. (Congress–Vanchit Alliance Confirmed Ahead of Civic Polls, Mumbai Seat Sharing Formula Announced)

मुंबई महापालिकेसाठी वंचित आणि काँग्रेस यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात राज्यात इतर ठिकाणीही काँग्रेस आणि वंचित यांची युती होईल, असे सपकाळ म्हणाले. मुंबईसाठी काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेस १५६ जागा लढवणार आहे.

Saam TV Breaking News
Solapur : भावी नगरसेवकाची निर्घृण हत्या, उशीनं तोंड दाबून उमेदवाराला संपवलं, ५० तोळं सोनं गायब

काँग्रेस आणि वंचित आघाडीमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय समि‍करणे बदलणार आहे. काँग्रेस-वंचित एकत्र आल्यामुळे दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर प्रभाव पडणार आहे. या युतीच्या घोषणेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

Saam TV Breaking News
Todays Gold Rate : सुवर्णनगरीत दरवाढीचा भडका! २४ तासात सोनं ₹१९०० नं तर चांदी २३००० महागले, वाचा लेटेस्ट गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com