Mumbai local new train services : पुढील ५ वर्षांत मुंबई लोकलची गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता आहे. कल्याण आणि डोंबिवली मार्गावर लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. हीच गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, पाच वर्षात मध्य रेल्वेवर ५४८ लोकल सेवा आणि पश्चिम रेल्वेवर १६५ सेवा सुरू होणार आहे. शनिवारी रेल्वे अधिकार्यांनी याबाबतची घोषणा केली. प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी आणि देशव्यापी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार असेल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले. गर्दीच्या स्थानकांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी झोनकडून क्षमता वाढीचे फायदे मिळविण्यासाठी अल्पकालीन आणि मध्यम मुदतीची पावले उचलण्यात येणार आहे.
पुढील 5 वर्षांत नवीन गाड्या सुरू करण्याची प्रमुख शहरांची क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. 2030 पर्यंत गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्यासाठी काम केली जातील. सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांचा समावेश करणे. शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स ओळखणे/ निश्चित करणे आणि तयार करणे. मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधा. विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्यांना हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधेच्या कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेडेशन/अद्ययावतीकरण आणि मल्टीट्रॅकिंग ही कामे केली जातील.
मध्य रेल्वे परळ-कुर्ला ५ व्या आणि ६ व्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला येथे डेक आणि ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि कल्याण-कसारा ३ऱ्या आणि ४व्या मार्गावर अपग्रेड करेल. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते विनीत अभिषेक म्हणाले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वहन क्षमता वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपनगरीय कोचमधील गर्दी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर २० नवीन रेल्वे सेवा सुरू केल्या जातील. तर नवीन एसी रॅक कधी सुरू होतील यावर अवलंबून जवळच्या भविष्यात अधिक एसी लोकल गाड्याही आणल्या जातील. सध्या, पश्चिम रेल्वे ११६ रॅकद्वारे दररोज १,४०६ उपनगरीय सेवा चालवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.