Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट, म्हणाल्या आजच

Ladki Bahin Yojana November December Installment Update : लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून वेळेत ई-केवायसी न केल्यास मासिक लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता
Ladki Bahin Yojana UpdateSaam Tv
Published On

Ladki Bahin Yojana eKYC Process : खात्यात ३ हजार रूपये येणार की ४५०० रूपये येणार, याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे. कारण, नाव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्याचा लाभ अद्याप खात्यात अद्याप आला नाही. त्यात जानेवारी सुरू होण्यास फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० येतील, असेही बोलले जातेय. ही सगळी उत्सुकता लाडक्या बहिणींमध्ये असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत महत्त्वाचे आवाहन केलेय.

आदिती तटकरेंनी नेमकं काय केले आवाहन?

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना खास आवाहन केलेय. आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय. शेवटचे ४ दिवस राहिलेत, ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन तटकरेंनी केलेय.

"लाडक्या बहिणींनो...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !"
आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता
Zilla Parishad election : झेडपीचा धुरळा नव्या वर्षात, २ टप्प्यात बार उडणार, संभाव्य वेळापत्रकच आले समोर, पाहा निवडणूक कार्यक्रम

या लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होणार -

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहि‍णींना आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे. ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही, त्या महिलांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ बंद होणार आहे. आतापर्यंत राज्यातील ४० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्या सर्व लाडक्या बहि‍णींचा मासिक लाभ बंद होणार आहे. आदिती तटकरेंनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केवायसी करवी, अन्यथा त्यांचाही लाभ बंद होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता
Today Gold Rate : दरवाढीने पुन्हा रेकॉर्ड तोडला, सोनं आणखी महागलं, मुंबई-पुण्यात 24k, 22k, 18k सोन्याची किंमत काय?

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची प्रोसेस (Ladki Bahin Yojana e-KYC Process)

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जा.

होमपेजवरच केवायसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरा.

यानंतर तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करायचे आहे. यासाठी त्यांचा आधार नंबर आवश्यक आहे.

यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करा.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता
KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com