Gold Rate Today : २०२५ चा शेवट गोड! सोनं आणि चांदीचे दर घसरले, वाचा गोल्ड किती झालं स्वस्त

Gold rate today in India December 31 2025 : वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशभरात सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१३६,०३० असून चांदीचा भाव MCX वर प्रति किलो ₹२,४०,४५० आहे.
Gold Rate Falls Sharply
Gold Rate Falls SharplySaam
Published On

Gold Rate Today In India : २०२५ वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोनं-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण देशभरात सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोमवारपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत मार्केटवरही पडलाय. बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमती घसरल्याची नोंद झाली. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर 136030 रुपए प्रति तोळा इतका आहे. २४ तासात सोन्याच्या दरामध्ये ३२० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. MCX वर चांदीचा भाव प्रति किलो २४०,४५० इतका आहे.

मागील काही वर्षांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. आता सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरत असल्याची नोंद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाण सोन्याच्या किंमतीवर पडलाय. जगभरातील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती स्थिरतेकडे जात आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतोय. जागतिक बाजारात पुढेही अशीच स्थिती राहिली तर सोनं अन् चांदीच्या दरात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पण जर नवीन काही संकट ओढावले तर २०२६ मध्येही सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gold Rate Falls Sharply
Municipal Election : दुर्दैवी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मृत्यू, अर्ज दाखल करून ऑफिस बाहेर आले अन्....

सराफा बाजारात सोन्याची किंमत काय?

राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१३६,०३० इतकी आहे. यामध्ये ३२० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२४,७०० रुपये आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमतीत किरकोळ वाढ नोंदवण्यात आला आहे. सराफा बाजारात १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१०२,०६० इतकी आहे.

Gold Rate Falls Sharply
जय महाराष्ट्र! तिकिट कापलं म्हणून थेट मनसेच्या ऑफिसला ठोकलं कुलूप, संतप्त होत म्हणाले...

कोणत्या शहरात सोन्याची किंमत ?

पुणे, नाशिक, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३५,८८० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,५५० रुपये आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३६,०३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,७०० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३६,०३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,७०० रुपये आहे.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १३६,०३० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १२४,७०० रुपये आहे.

कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१३५,८८० आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१२४,५५० आहे.

Gold Rate news
Gold Rate newsgoodreturns
Gold Rate Falls Sharply
Alaya F: बोल्डनेसचा कहर; कोण आहे ही सुपरहॉट सुंदरी!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com