

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने त्यांची सेवा जास्त सोपी व्हावी म्हणून नवे अपडेट समोर आणले आहेत. या अपडेटमध्ये युजर्सना भरपुर सुविधा सोप्या पद्धतीने ऑनलाइन मिळू शकणार आहेत. EPFO 3.0 मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस सुद्धा सोपी करण्यात आली आहे, कारण EPFO च्या बऱ्याच सेवा मोबाईल नंबरवर आधारित आहेत.
तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर हा तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN शी थेट जोडलेला असतो. OTP च्या आधारे लॉगिन, UAN अॅक्टिव्हेशन, KYC अपडेट, पीएफ क्लेम सेटलमेंट आणि खात्याशी संबंधित अलर्ट मिळवण्यासाठी सक्रिय मोबाईल नंबर असणं अत्यंत गरजेचं आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा बंद असेल, तर PF खात्याशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
EPFO 3.0 अंतर्गत मोबाईल नंबर अपडेट केल्याने ऑथेंटिकेशन प्रक्रिया खूप जलद आणि सुरक्षित होते, असं EPFO कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदस्यांनी आपला सध्याचा आणि सक्रिय मोबाईल नंबर EPFO खात्यात नोंदवणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर unifiedportal-mem.epfindia.gov.in येथे लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करा. मग Contact Details निवडा. त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय निवडून नवीन मोबाईल नंबर दोन वेळा टाका. पुढे ‘Get Authorization PIN’ वर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येतो. तो OTP सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेटची प्रक्रिया पूर्ण होते.
जर एखाद्या सदस्याला ऑनलाइन पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करता येत नसेल, तर ऑफलाइन पद्धत देखील उपलब्ध आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने आवश्यक फॉर्म भरून जवळच्या प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जावे लागते. ओळख पटवण्यासाठी आधार किंवा पॅन कार्डच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर EPFO कार्यालयाकडून मोबाईल नंबर अपडेट करण्यात येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.