

सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकांना आरामासाठी वेळच मिळत नाही. दिवसरात्र मेहनत करुन चांगली लाइफस्टाइल फॉलो करायला त्यांना वेळ मिळत नाही. पण वेळेचं नियोजन करुन तुम्ही चांगल्या सवयी आत्मसाद करु शकता आणि जीवनशैलीही जगू शकता. यात तुम्ही योग्य आणि वेळेवर आहार, सकाळी लवकर उठण्याची सवय, बाहेरचे जंक फूड टाळणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम करणं. मिळेल तेव्हा किमान स्ट्रेचिंग किंवा मेडीशन करणं खूप फायदेशीर ठरु शकतं.
अनेकदा असं होतं की आपण खूप धावपळीच्या मेहनीच्या मागे इतके लागतो की, तब्येतीकडे आपोआप दुर्लक्ष होतं. यातलीच एक समस्या म्हणजे लो ब्लड प्रेशरच्या समस्या. रक्तदाब 90/60 mm Hg पेक्षा कमी झाला असेल म्हणजे तो लो किंवा कमी झाला आहे. याने काही लोकांना फारसा त्रास होत नाही किंवा काही परिणामही जाणवत नाही. पण शरीराला पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न झाल्याने गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे वेळेवर लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे महत्वाचे आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला मोठ्या जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
१. चक्कर येणे.
जेव्हा ब्लड प्रेशर लो होतं तेव्हा आपल्याला चक्कर येते. कारण तुमच्या मेंदूपर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. हे लक्षण खूप गंभीर मानले जाते. तसेच तुम्हाला थकवाही जाणवतो. चालण्याची ताकद राहत नाही, अशक्तपणा, मानसिक थकवा जाणवतो.
२. ह्रदयातील बदल.
रक्तदाब जेव्हा कमी होतो तेव्हा शरीरात खूप गोंधळ उडतो. विशेषतः वृद्धांमध्ये हे लक्षण जास्त धोकादायक ठरू शकतं. यामध्ये अचानक ह्रदयाची धडधड वाढलेली जाणवते, डोळ्यांवर परिणाम होऊन धूसर दिसायला लागतं किंवा अचानक अंधुकपणा येतो.
३. शरीरात होणाऱ्या वेदना.
कमी रक्तदाबामुळे मानेच्या मागच्या बाजूस, खांद्यांमध्ये किंवा डोक्याच्या मुळाशी वेदना होतात. याने मळमळ होते, उलटी किंवा पोटात दुखतं, हात-पाय थंड पडतात, श्वास घ्यायला त्रास होतो किंवा छातीत दुखतं, चमका मारतात. ही यामध्ये लक्षणे दिसतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता उपचार सुरु केले पाहिजेत. नाहीतर तुम्हाला या समस्येने इतर गंभीर आजारांनाही सामोरं जावं लागतं.
सूचना: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.