

सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. या दिवसात शरीराची खूप हालचाल होते आणि अर्थात हालचाल करायलाही कोणाला आवडत नाही. त्यात ब्लेड प्रेशर सध्या अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ही समस्या तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि तुमच्या हालचालींवर अवलंबून असते. पण काही वेळेत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधंच पुरेशी नसतात. तर काही एक्सरसाइजही तुम्हाला यापासून वाचवू शकतात. पुढे दिलेल्या एक्सरसाइज BP नियंत्रणात आणण्यासाठी आणि हा आजार टाळण्यासाठी करु शकता.
कोणत्याही आजावर वेळेवर नियंत्रण ठेवलं नाहीतर भविष्यात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. तसचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवलं नाही तर हृदयविकार, स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, रोजच्या रोज व्यायाम आणि लाइस्टाइलमधले बदल गरजेचे मानले जातात. मात्र आता तुम्ही फक्त दोन मिनिटांत रक्तदाब कमी करण्यासाठी एक सोपी एक्सरसाइज करु शकता. जी संशोधनातून कळाली आहे.
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार ‘वॉल सिट’ नावाची ही सोपी पण प्रभावी एक्सरसाइज रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वॉल सिट करताना तुम्ही एका भिंतीला पाठ टेकवून गुडघे 90 अंशात वाकवून बसल्यासारख्या स्थितीत उभं राहायचं असतं. या स्थितीत काही वेळ तसंच थांबायचं असतं. याने पायांच्या स्नायूंवर ताण येतो आणि रक्ताभिसरण सुधारतं. ही फक्त २ मिनिटांची एक्सरसाइज आहे.
तज्ज्ञांच्या मते, वॉल सिट करताना सुरुवातीला रक्तदाबात थोडी वाढ होते, मात्र त्यानंतर शरीरात ‘रिबाउंड इफेक्ट’ दिसून येतो. या प्रक्रियेत रक्तवाहिन्या सैल होतात आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. नियमितपणे वॉल सिट केल्यावर तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.
टीप : वरील माहिती ही केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणताही व्यायाम किंवा आरोग्याशी संबंधित बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.