Heart Attack कमी तरी मृत्यूचं कारण तेच! या सवयी हृदयासाठी घातक, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

American Heart Association Report: बदलत्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव आणि आहारातील चुकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
Heart Attacks Decline, But Remain a Leading Cause of Death, Doctors Warn
Even With Medical Advances, Heart Attacks Continue to Kill Millionsgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतो. यासगळ्याला कारणभूत तुमच्या चुकीच्या सवयीच आहेत. सध्या मोबाइलचा वापर लोक दिवसरात्र करत असतात. त्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. पुढे मग त्यांच्या दिवसाचं गणितच हलतं. लोक नाश्त्याच्या वेळेला जेवतात आणि जेवणाच्या वेळेस नाश्ता करतात. याचा परिणाम तुमच्या शरीरावर खूप वाईट प्रमाणात होतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.

शरीर जीवतं ठेवण्याचं काम तुमचं ह्रदय करतं पण त्याच ह्रदयाला तुम्ही जर नुकसान केलतं तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. तर याचा शेवट हा मृत्यू असतो. कारण भारतात हार्ट अटॅकच्या आजाराने लोखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. याचं वय पाहायला गेलं तर ते ३० ते ६० वयोगटातल्यांचे आहे. असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. तर दुसरी बाब ही अतिशय चिंताजनक आहे. कारण अमेरिकेत सध्या हृदयविकाराचे रुग्ण कमी झाले आहेत.

Heart Attacks Decline, But Remain a Leading Cause of Death, Doctors Warn
Republic Day 2026 Wishes: WhatsApp वर शेअर करा देशभक्तीने भरलेले मराठी, हिंदी आणि English संदेश एका क्लिकवर

तरीही अमेरिकेत हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत काहीशी घट झाली असली, तरीही अनेकांच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅकच आहे. असे अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) च्या नव्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. ही घट असूनही हृदयविकार आणि इतर हृदयवहिन्याच्या संबंधित आजारांमुळे होणारे मृत्यू हे कॅन्सर आणि अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त असल्याचं अहवालात दिलेले आहे.

आपल्या शरीरातल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये होणाऱ्या ब्लॉकेजमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली आहे. अशा मृत्यूंमध्ये 5.9 टक्क्यांची घट आहे. तरीही कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे दर तीन मिनिटांत दोन जणांचा मृत्यू होतो असं स्पष्ट झालं आहे.

तज्ज्ञांच्या मते, हृदयविकारावर उपचार करण्यापेक्षा तो आजार कसा होणार नाही. यासाठी काही रोजच्या आहारात बदल केले पाहिजेत. तुम्हाला त्यासाठी लाखो रुपये खर्च न करता, पौष्टीक आहार, रोज व्यायाम, पुरेशी झोप आणि तंबाखू न खाणे ही सवय लावाली लागेल. यामुळे हृदयाच्या कोणतीच हानी पोहोचत नाही. यासोबतच वजन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. या सवयींमुळे हृदयविकारामुळे होणारे 40 टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heart Attacks Decline, But Remain a Leading Cause of Death, Doctors Warn
Chanakya Niti: कोणत्या गोष्टींचा जास्त मोह ठेवू नये? जाणून घ्या जीवनाचं कडू सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com