Blocked Arteries Symptoms: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष केल्याने वाढेल हार्ट अटॅकचा धोका

Heart Attack Risk: हृदयाच्या शिरा बंद होण्याची लक्षणं वेळेत ओळखल्यास जीवघेण्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेली सात महत्त्वाची सुरुवातीची लक्षणं जाणून घ्या आणि सावध रहा.
Heart Attack Risk
Blocked Arteries Symptomsgoogle
Published On

हृदयाचं आरोग्य हे एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र हृदयाच्या शिरा किंवा रक्तवाहिन्या बंद होऊ लागल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की हृदयविकार किंवा हार्ट अटॅक. अशा स्थितींचा धोका टाळण्यासाठी सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे आहे. कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं की, ''जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्या अडथळ्यामुळे बंद होतात, तेव्हा रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या लक्षणांची वेळेत ओळख आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.''

हृदयाच्या शिरा बंद होण्याची सुरुवातीची काही प्रमुख लक्षणं पुढील प्रमाणे आहेत. छातीत वेदना (अॅन्जायना) हे सर्वात सामान्य लक्षण आहे. ही वेदना दाबल्यासारखी, घट्ट झाल्यासारखी किंवा चिरडल्यासारखी जाणवते. काही वेळा ही वेदना खांद्यापर्यंत, मान, हात, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरतात. छातीत वेदना विशेषतः शारीरिक हालचालीदरम्यान किंवा ताणतणावाच्या वेळी होत असेल, तर ती दुर्लक्षित करू नयेत.

Heart Attack Risk
PAN Card Linking: हे काम केलं नाही तर... १ जानेवारीपासून पॅनकार्ड वापरता येणार नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

श्वास घेण्यास त्रास होणे, अगदी हलक्या कामानंतरही दम लागणे हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे. हे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट न होण्याचे चिन्ह असू शकते. तसेच, नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे, किंवा सतत दमल्यासारखं वाटणं हीसुद्धा हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याची संकेतं असू शकतात.

काही रुग्णांमध्ये चक्कर येणे, हलके डोके गरगरणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिसू शकतात. हे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा आल्याने घडते. काहीवेळा मळमळ, पोटात जळजळ किंवा अपचनासारख्या समस्या देखील हृदयविकाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. विशेषतः त्या वेळी छातीत जडपणा किंवा वेदना जाणवत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

थंड घाम येणे किंवा अचानक प्रचंड घाम फुटणे हेही गंभीर चेतावणीचं लक्षण आहे. कोणत्याही कारणाशिवाय घाम येत असेल, विशेषतः थंड घाम, तर तो इशारा म्हणून घ्यावा. तसेच, पाय, टाच किंवा पायांच्या पंज्यांमध्ये सूज येणे हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होऊ शकते.

Heart Attack Risk
Liver Damage Symptoms: सतत अपचन, जुलाब, पोट दुखतंय? असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com