PAN Card Linking: हे काम केलं नाही तर... १ जानेवारीपासून पॅनकार्ड वापरता येणार नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Linking: १ जानेवारी २०२६ पासून पॅनकार्ड वापरता येणार नाही, जर ते आधारशी लिंक केले नाही. सरकारने दिलेल्या या सूचनेनुसार, आजच लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा.
Finance News
PAN Card Linkingsaam tv
Published On

पॅनकार्ड हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक आवश्यक सरकारी पुरावा आहे. मात्र ज्यांनी आपले पॅनकार्ड अजुनही आधारकार्डशी लिंक केलेले नाही, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की आधार आणि पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुम्ही १ जानेवारी २०२६ पर्यंत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय (Deactivate) होईल आणि ते कोणत्याही सरकारी किंवा आर्थिक व्यवहारासाठी वापरता येणार नाही.

सरकारने आधीच नागरिकांना सूचना दिली आहे की, जे लोक पॅन आणि आधार लिंक करणार नाहीत त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि ते इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, बँक व्यवहार, म्युच्युअल फंड, किंवा इतर आर्थिक सेवांसाठी अमान्य ठरेल.

Finance News
Garlic Bhurka Recipe: जेवताना तोंडी लावायला बनवा झणझणीत लसणाचा भुरका

पॅन आणि आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

1. पॅनकार्ड आधाराशी लिंक करण्यासाठी इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करा.

2. होमपेजच्या डाव्या बाजूस असलेला Link Aadhaar पर्याय निवडा.

3. पॅन आणि आधार क्रमांक टाका.

4. आवश्यक फी 1000 रुपये भरून प्रक्रिया पूर्ण करा. तुमची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर काही वेळात लिंकिंग पूर्ण होईल.

आधार-पॅन लिंक झाले आहे का कसे तपासायचे?

तुम्हाला पुन्हा इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन Link Aadhaar Status पर्याय निवडावा लागेल. पॅन आणि आधार क्रमांक टाकून तुमचे लिंकिंग स्टेटस तपासा.

SMS च्या मदतीने लिंकिंग स्टेटस जाणून घेण्याची पद्धत

आपण SMS च्या माध्यमातूनही आपले आधार-पॅन लिंकिंग स्टेटस तपासू शकता. त्यासाठी UIDPAN - आधार क्रमांक- पॅन क्रमांक-

हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा. काही मिनिटांत तुम्हाला उत्तर मिळेल ज्यात लिंकिंग स्टेटसची माहिती दिली जाईल. सरकारने नागरिकांना वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून १ जानेवारी २०२६ नंतर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. म्हणूनच आजच आपले पॅन आणि आधार लिंक करा.

Finance News
WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com