Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात प्रत्येक घरात तोंडी लावायला भुरका असतोच. त्यातला लसणाचा झणझणीत भुरका हा जेवणाचा स्वाद दुप्पट करणारा असतो.
शेंगदाणे दीड कप, तीळ 3 टेबलस्पून, लसूण पाकळ्या 14-15, लाल तिखट 2 टेबलस्पून, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मीठ. 
सर्वात आधी शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे हलके भाजून घ्या. यामुळे भुरक्याला खास सुगंध आणि चव येते.
थंड झाल्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करा. थोडे तीळ बाजूला ठेवून द्या, ते नंतर फोडणीत वापरायचे आहेत.
आता लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या. हाच लसूण भुरक्याला झणझणीतपणा आणि खास चव देतो.
कढईत तेल तापवा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि बाजूला ठेवलेले तीळ घालून छान फोडणी करून घ्या.
फोडणीत ठेचलेला लसूण घाला आणि 2-3 मिनिटं परतवून घ्या. लसूण थोडासा सोनेरी झाला की भुरका तयार होण्यासाठी बेस तयार होतो.
आता त्यात शेंगदाणे-तीळाचा कूट, लाल तिखट आणि मीठ घालून छान परता. सुगंध दरवळला की भुरका तयार.