Sakshi Sunil Jadhav
अनेकदा जुनी सॅंडल दीर्घकाळ वापरल्याने किंवा उन्हात ठेवल्याने लेदर किंवा सिंथेटिक मटेरियल आकुंचन पावते, त्यामुळे ती घट्ट वाटू लागते.
सॅंडल थोडी ओलसर कापडाने पुसा आणि नंतर पायात घालून काही मिनिटे चालून घ्या. त्यामुळे मटेरियल थोडं सैल होतं आणि मूळ आकार परत येतो.
लेदर सॅंडल असेल तर थोडं मॉइश्चरायझर किंवा लेदर क्रीम सॅंडलच्या आतील भागावर लावा. त्यामुळे मटेरियल मऊ होतं आणि घट्टपणा कमी होतो.
सॅंडल पायात घालण्याआधी जाड मोजे घाला आणि काही वेळ तसेच चालून घ्या. ही ट्रिक सॅंडलचा आकार थोडा वाढवते आणि ती सैल वाटू लागते.
सॅंडल पायात घालून ठेवताना हेअर ड्रायरने मध्यम तापमानावर हवा द्या. उष्णतेमुळे मटेरियल थोडं फुलतं आणि सैल होतं.
दोन प्लास्टिक बॅगमध्ये पाणी भरून सॅंडलमध्ये ठेवा आणि ती फ्रीजरमध्ये काही तास ठेवा. बर्फ झाल्यानंतर पाणी फुगते आणि सॅंडल आपोआप सैल होते.
अनेक जण सॅंडल पाण्यात ठेवतात, पण हे सिंथेटिक किंवा फॅब्रिक सॅंडलसाठी हानिकारक ठरू शकतं. फक्त थोडं ओलसर कापड वापरणं योग्य.
बाजारात शू स्ट्रेचर मिळतात. हे उपकरण वापरून सॅंडल हळूहळू सैल करता येते. ही पद्धत सुरक्षित आणि टिकाऊ आहे.