Sakshi Sunil Jadhav
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात वसलेलं खजियार हे ठिकाण आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हटलं जातं.
हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ डलहौजीपासून केवळ २० किमी अंतरावर आहे. पश्चिम हिमालयातील धौलाधर पर्वताच्या पायथ्याशी खजियार वसलेले आहे.
७ जुलै १९९२ रोजी स्विस चान्सलर विली ब्लेझर यांनी या ठिकाणाला भेट दिली. त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने ते इतके भारावले की त्यांनी या ठिकाणाला 'मिनी स्वित्झर्लंड' हे नाव दिलं.
विली ब्लेझर इतके प्रभावित झाले की त्यांनी खजियारमधील एक दगड स्विस संसदेत ठेवण्यासाठी घेऊन गेले. यामुळे खजियारचं नाव जगभर गाजलं.
खजियारचं मुख्य आकर्षण म्हणजे हिरव्या दऱ्यांनी वेढलेलं तलाव, ज्यातून बर्फाच्छादित हिमालयीन शिखरांचं मंत्रमुग्ध करणारं दृश्य दिसतं.
इथे तुम्ही झॉर्बिंग, पॅराग्लायडिंग, घोडेस्वारी आणि ट्रेकिंग सारख्या रोमांचक अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे हे ठिकाण युवापिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे.
खजियारजवळचं खज्जी नाग मंदिर हे एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. येथे नागदेवता आणि भगवान शंकराची मूर्ती असून, पांडव-कौरवांच्या दगडी कोरीव आकृत्या पाहायला मिळतात.
खजियारचं हवामान वर्षभर आल्हाददायक असतं. विशेषतः मार्च ते जून या काळात हवामान स्वच्छ असल्याने निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो.