Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धिमान, अर्थशास्त्र आणि राजकारण जाणणारे महान विचारवंत मानले जाते. त्यांच्या “चाणक्य नीति” मध्ये त्यांनी मानवी जीवनातील अनेक सत्य आणि शिकवणी दिल्या आहेत.
तुम्ही या चाणक्य नीतिनुसार काही सवयी आणि स्वभाव बदलू शकता. त्यामुळे माणूस संपूर्ण आयुष्यभर धनसंपत्तीपासून लांब राहतो.
चाणक्यांच्या मते, जे लोक स्वतःचे काम दुसऱ्यांवर टाकतात किंवा आत्मनिर्भर बनत नाहीत, ते कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत.
जे लोक स्वतःपुढाकार घेत नाहीत आणि कायम इतरांच्या मदतीवर अवलंबून असतात. ते समाजात उपयोगी ठरत नाहीत. त्यांची प्रगती थांबते.
कठोर आणि कडवट बोलणारे लोक आपले भाग्य स्वतः कमकुवत करतात. गोड बोलणं हीही एक प्रकारची संपत्ती आहे.
जे लोक बोलण्यात गोडवा ठेवत नाहीत, त्यांच्यापासून लोक हळूहळू दूर जातात. त्यामुळे ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही बाजूंनी मागे पडतात.
चाणक्यांच्या मतानुसार, आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजचं काम उद्यावर टाकणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत.
आळशी व्यक्ती वेळ, क्षमता आणि संधी हे तीनही गमावतात. परिणामी ते कधीही आर्थिक स्थैर्य मिळवू शकत नाहीत.