Soft Chapati Tips: डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेनं भिजतात? फक्त '१' गोष्ट करा, रात्रभर चपात्या राहतील ताज्या

Sakshi Sunil Jadhav

चपाती टिप्स

बर्‍याच वेळा आपण सकाळी गरमागरम चपात्या बनवून डब्यात ठेवतो, पण दुपारी जेवायला बसल्यावर त्या चपात्या ओल्या, चिकट आणि पाणी सुटलेल्या अवस्थेत मिळतात.

Soft Chapati Tips | google

मऊ चपात्या

पुढे चपातीची चव आणि आकार दोन्ही खराब होतो. पण काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकता. चला जाणून घेऊया सोप्या टिप्स.

Soft Chapati Tips | google

गरम चपाती झाकू नका

चपात्या तयार झाल्यानंतर लगेच झाकल्याने वाफ आत साठते आणि पाणी सुटतं. त्या थोड्या गार झाल्यावरच डब्यात ठेवा.

Soft Chapati Tips | google

टिश्यू पेपर ठेवा

डब्याच्या तळाशी किंवा चपात्यांच्या मध्ये एक कोरडा टिश्यू पेपर ठेवल्याने जास्त ओलावा शोषला जातो. त्यामुळे चपात्या कोरड्या राहतात.

Soft Chapati Tips | google

तूप किंवा तेल लावा

गरम चपातीवर हलकं तूप किंवा तेल लावल्याने ती मऊ राहते आणि ओलावा साठत नाही.

Soft Chapati Tips | google

इन्सुलेटेड डबा वापरा

इन्सुलेटेड (hot case) डबा वाफ आत अडकवतो नाही. त्यामुळे चपात्या दीर्घकाळ ताज्या राहतात.

Soft Chapati Tips

चपात्या थंड करा

अर्धवट गरम असताना डब्यात ठेवल्यास वाफ तयार होते आणि पाणी सुटतं. त्यामुळे चपात्या खोलीच्या तपमानावर आल्यावरच पॅक करा.

Soft Chapati Tips

चपात्यांची जाडी

जास्त पातळ चपाती पटकन ओली होते, तर जास्त घट्ट चपाती कडक होते. योग्य जाडी ठेवा म्हणजे चव टिकते.

Soft Chapati Tips

NEXT: भुवया आणि पापण्यांचे केस खूपच पातळ दिसतायेत? बनवा हे सोपे घरगुती सीरम, ७ दिवसांत जाणवेल फरक

Eyebrow Care | google
येथे क्लिक करा