Sakshi Sunil Jadhav
WhatsApp हे आपल्या दैनंदिन वापरातले सगळ्यात महत्वाचे अॅप झाले आहे. याचा फायदा सर्वसामान्यांपासून उच्च वर्गीयांना होत आहे.
WhatsAppमध्ये आता तुम्ही तुमचे प्रायव्हेट चॅट लपवू शकता. महत्वाच्या नोंदी ठेवू शकता, तसेच इतरांना ऑनलाइन न दिसता तुम्ही चॅटींग करू शकता.
तुम्ही सोपी सेटिंग करुन तुमचे ऑनलाइन स्टेटस इतरांपासून लपवू शकता. यासाठी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
सगळ्यात आधी तुम्हाला WhatsApp अॅप ओपन करावे लागेल. मग वरच्या उजव्या कोपऱ्यात ३ डॉट्सवर क्लिक करावे लागेल.
पुढे तुम्हाला सेटिंग्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे प्रायव्हसी या पर्याय निवडा.
शेवटी तुम्हाला लास्ट सीन या पर्यायवर क्लिक करावे लागेल. त्यामध्ये आणखी चार ऑपशनन्स मिळतील.
यामध्ये तुम्ही ऑनलाइन स्टेटस पर्यायावर क्लिक करून बंद करु शकता. तुमच्याकडे शेवटचे पाहिलेले सेटिंग निवडता येऊ शकते.
जर तुम्ही तुमचा लास्ट सीन पाहिला नाही किंवा ऑनलाइन स्टेटस शेअर केला नाहीतर इतरांचे स्टेटस तुम्हाला दिसणार नाहीत.