Liver Damage Symptoms: सतत अपचन, जुलाब, पोट दुखतंय? असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे

Liver Care: लिव्हर डॅमेजची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अवघड असते, पण शरीर काही संकेत देतं. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास गंभीर आजार टाळता येतात.
Liver Damage Symptoms
Liver Caregoogle
Published On

लिव्हर हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. लिव्हरचे कार्य म्हणजे विषारी पदार्थ बाहेर टाकणे, रक्त शुद्ध करणे आणि पचनक्रिया सुधारणे. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र चुकीच्या आहारामुळे, कमी झोपेमुळे लिव्हर खराब होतो शकतो. याची सुरुवाची लक्षणे पुढील बातमीत देण्यात आली आहेत.

मुळात लिव्हर डॅमेजची सुरुवातीची लक्षणे ओळखणे कठीण असतं. पण शरीर काही सूक्ष्म संकेत देतात जी वेळीच ओळखून त्यावर उपचार केले पाहिजे. नाहीतर ही समस्या तुमच्या नकळत जीवावर बेतू शकते.

Liver Damage Symptoms
Bhakri Making Tips: भाकरी थापताना तुटते, फुगतच नाही? वापरा १ सोपी ट्रिक, भाकऱ्या होतील गोल अन् मऊ

लिव्हर डॅमेजची संपूर्ण लक्षणे

सतत मळमळ आणि पोट बिघडणे हे लिव्हर खराब होण्याची प्रमुख लक्षणे आहेत. लिव्हर शरीरातील विषारी घटक फिल्टर करण्याचं काम थांबवतो तेव्हा पचनावर त्याचा परिणाम होतो. थकवा, अशक्तपणा आणि सतत दमल्यासारखे वाटतं ही लिव्हर फेल्युअरची लक्षणे आहेत. याचं कारण म्हणजे विषारी पदार्थ रक्तात साचलेले असतात.

लिव्हर नीट काम करत नसेल तर पित्ताचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे फॅटमुळे पचन नीट होत नाही. याने भूक कमी लागते. मग सतत अपचन, जुलाब, पोट फुगणे किंवा गॅलस्टोन तयार होणे यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या जाणवायला लागतात. लघवीचा रंग गडद होणे हेही एक गंभीर लक्षण आहे. हे शरीरात बायलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे होतं. जे लिव्हर योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही. याच कारणामुळे काही वेळा शौचाचा रंग फिकट पिवळा, करडा किंवा मातीसारखा दिसतो.

त्वचा आणि डोळ्यांना पिवळसरपणा येणे म्हणजे जॉन्डिस होणे. पोटात सूज, दुखणे किंवा फुगणे हीही लिव्हरशी संबंधित लक्षणे असू शकतात. याला वैद्यकीय भाषेत असाइटिस म्हटले जाते. याचप्रमाणे पाय आणि गुडघ्यांमध्ये सूज येणे, त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा येणे किंवा सहज दुखापत होणे हे देखील लिव्हर डॅमेजमुळे होते.

Liver Damage Symptoms
Hair Care: केस खूप गळतायेत, कोरडे आणि पांढरे होतायेत? मग हा १ पदार्थ ठरेल बेस्ट, होतील दाट आणि चमकदार केस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com