

केस गळणे, कोरडे होणे किंवा केसांची चमक निघून जाणे या समस्या महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. पण यावर उपाय सलूनमध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातच लपला आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले अळशीचे बी (Flax Seeds) म्हणजे केसांसाठी एक नैसर्गिक सुपरफूड आहे. लहान असली तरी या बियांमध्ये असणारे पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करतात.
फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि लिग्नान्स असतात. याच्या साहाय्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं, केस तुटण्याची समस्या कमी होतात आणि नवीन केसांची वाढ होते. ओमेगा-३मुळे टाळूला आर्द्रता मिळते, कोंडा आणि कोरडेपणा कमी होतो. तर व्हिटॅमिन ई केसांना प्रदूषण, उष्णता आणि तणावामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते.
फ्लॅक्स सीड वॉटर हे केसांच्या वाढीसाठी बेस्ट आणि सोपा मार्ग मानला जातो. यासाठी एक चमचा फ्लॅक्स सीड्स पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून उपाशीपोटी प्या. हे पाणी पचन सुधारतं आणि केसांना आतून आवश्यक पोषक मिळवून देतं. काहीजण हे पाणी उकळून कोमट स्वरूपातही पितात. थोडासा चिकटपणा जाणवला तरी काही दिवसात त्याची सवय लागते आणि केसांच्या वाढीत बदल जाणवतो.
तुम्हाला पाणी प्यायला आवडत नसेल तर फ्लॅक्स सीड्स भाजून त्याची पूड करूनही वापरता येते. दररोज एक चमचा पूड दह्यात, दुधात, स्मूदीत किंवा पिठात मिसळू शकता. यामुळे शरीराला रोजच्या आहारातून केसांना आवश्यक पोषण मिळतं. रोजच्या सेवनाने हार्मोन्स संतुलित राहतात, जे पीसीओएस किंवा तणावामुळे होणाऱ्या केसगळतीवर नियंत्रण ठेवतात.
जर तुम्हाला फ्लॅक्स सीड खायला आवडत नसतील तर तुम्ही त्याचा वापर थेट केसांवर करु शकता. फ्लॅक्स सीड जेल तयार करून ते केसांवर लावल्यास केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात. यासाठी अर्धा कप फ्लॅक्स सीड्स दोन कप पाण्यात उकळा. पाणी घट्ट झाल्यावर ते गाळून थंड करा. हे जेल केसांना आणि टाळूला लावून ३०-४० मिनिटांनी सौम्य शँपूने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस गळती कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.