Sakshi Sunil Jadhav
घरात रोजची भाकरी बनवताना अनेकांना एकच प्रश्न पडतो, भाकरी तुटते, फुगत नाही आणि कडक का होते? कारण थोडीशी चूकही भाकरीच्या टेक्स्चरवर परिणाम करते.
योग्य प्रमाण, पाणी आणि थापायची पद्धत माहित असेल तर भाकरी अगदी मऊ आणि फुगलेली बनवता येते. चला जाणून घेऊया भाकरी मऊ आणि परफेक्ट बनवण्यासाठीचे सोप्या टिप्स.
भाकरीसाठी ज्वारी, बाजरी किंवा गव्हाचं ताजं पीठ वापरा. जुने किंवा बारीक दळलेले पीठ भाकरी फुगू देत नाही.
पीठ मळताना थोडं कोमट पाणी वापरल्याने पीठ मऊ आणि लवचिक राहतं. थंड पाणी वापरल्यास भाकरी कडक होते.
भाकरीचं पीठ हाताने नीट मळा. जितकं मळाल तितकी भाकरी मऊ होते. पीठात थोडं पाणी शोषून घेतल्यावर पुन्हा एकदा मळा.
मळल्यानंतर ५-१० मिनिटं पीठ झाकून ठेवल्यास ते सेट होतं आणि भाकरी चांगली थापता येते.
भाकरी थापताना जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने थापल्याने भाकरी समान जाडीची होते आणि फुगते.
भाकरी शेकण्यापूर्वी तवा मध्यम गरम असावा. थंड तव्यावर शेकल्यास भाकरी कडक आणि कोरडी होते.