Sakshi Sunil Jadhav
कोलेस्ट्रॉल वाढणं लगेच जाणवत नाही, पण हळूहळू ते हृदयासाठी गंभीर ठरू शकतं. काही रोजच्या खाण्याच्या सवयी यामागचं मोठं कारण असतात. तज्ज्ञांच्या मते, पुढील 8 पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं.
फ्रेंच फ्राइज, भजी, वडा, तळलेलं चिकन हे पदार्थ ट्रान्स फॅट्सने भरलेली असतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) कमी करतात.
मटण, स्टेक, पोर्क यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं. सतत खाल्याने रक्तातले कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतं.
तूप, चीज, क्रीम, फुल क्रीम दूध हे पदार्थ हृदयासाठी घातक ठरू शकतात. यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल साचतं.
सॉसेज, बेकन, हॉटडॉग, सलामी यामध्ये मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अपायकारक फॅट्स जास्त असतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्यास कारणीभूत ठरतात.
केक, कुकीज, मफिन्स हे दिसायला गोड असले तरी आतून कोलेस्ट्रॉल बॉम्ब ठरू शकतात. यात साखर आणि सॅच्युरेटेड फॅट भरपूर असतं.
बर्गर, पिझ्झा, फ्राईड चिकन यामध्ये रिफाइंड कार्ब्स, मीठ आणि वाईट फॅट्स असतात. नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
चिप्स, क्रॅकर्स, पॅकेटमधील बिस्किटं यामध्ये पोषणमूल्य कमी आणि अपायकारक तेलं जास्त असतात. हे वजन आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढवतात.
सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक ज्यूस, गोड चहा यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोलेस्ट्रॉल आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.