Sakshi Sunil Jadhav
सुंदर आणि दाट आयब्रो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. त्यासाठी अनेक जण टॉपिकल मिनॉक्सिडिलचा वापर करतात.
तुम्ही वापरत असलेले टॉपिकल मिनॉक्सिडिल चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्वचेवर दुष्परिणाम किंवा नको त्या ठिकाणी केस वाढण्याचा धोका असतो. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
मिनॉक्सिडिल रात्री झोपण्याआधी लावल्याने ते कपाळ, गाल किंवा पापण्यांवर पसरू शकतं. त्यामुळे दिवसा, स्किनकेअर झाल्यानंतर वापरणं जास्त सुरक्षित ठरु शकतं.
भुवयांवर पेन्सिल किंवा जेल लावण्याआधी मिनॉक्सिडिल लावल्याने ते नीट शोषले जाते आणि स्मज होण्याचा धोका कमी राहतो.
स्पुली ब्रश (भुवयांचा ब्रश) वापरून मिनॉक्सिडिल लावा. त्याने औषध फक्त भुवयांपुरतं मर्यादित राहतं.
जास्त मिनॉक्सिडिल लावल्याने त्वचेची जळजळ, खाज किंवा नको त्या ठिकाणी केस येण्याची शक्यता वाढते.
फोम असो वा लिक्विड, स्पुलीवर थोडेसे घ्या, एक्स्ट्रा काढून टाका आणि हलक्या हाताने भुवयांवर फिरवा.
लावल्यानंतर किमान एक मिनिट थांबा. औषध सुकल्यावरच भुवया सेट करण्यासाठी जेल किंवा इतर प्रॉडक्ट वापरा.
भुवया वाढायला वेळ लागतो. रोज वापर केल्यासच परिणाम दिसतात. काही दिवस चुकवले तर प्रभाव कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.