Sakshi Sunil Jadhav
होळीला रंगांची उधळण करताना अनेकदा खिशात असलेल्या नोटांनाही रंग लागतो किंवा त्या ओल्या होतात. त्यामुळे अशा नोटा चालतात का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
मात्र, Reserve Bank of India च्या नियमांनुसार रंग लागल्यामुळे नोट अवैध ठरत नाही. मग त्यांचं काय करायचं? जाणून घ्या.
होळीच्या रंगाने माखलेली नोट आपोआप बाद होत नाही. नोटेवर फक्त रंगाचे डाग असले तरी ती कायदेशीरदृष्ट्या वैध राहते.
जर नोटेची ओळख स्पष्ट दिसत असेल, तर ती नोट बाजारात कोणत्याही व्यवहारासाठी वापरता येते. दुकानदारांनी अशा नोटा नाकारू नयेत, असे आरबीआयचे मार्गदर्शन आहे.
रंगामुळे नोट खूप खराब झाली असेल, तर ती जवळच्या बँकेत जाऊन बदलता येते. बँक शाखा नोट तपासून त्याऐवजी नवीन किंवा चांगल्या स्थितीतील नोट देते.
नोट बदलण्यासाठी बँक ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असते.
जर रंगामुळे नोटेचा नंबर, महात्मा गांधींचा फोटो किंवा गव्हर्नरची स्वाक्षरी पूर्णपणे दिसेनाशी झाली असेल, तर नोट बदलताना अडचण येऊ शकते.
नोटेवर राजकीय घोषणा, संदेश किंवा काहीही लिहिले असल्यास ती नोट स्वीकारली जाण्याची शक्यता कमी असते. आरबीआयच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’नुसार अशा नोटा टाळल्या जातात.
रंग लागण्याबरोबरच नोट फाटलेली असल्यास बँक तिची स्थिती पाहून काही टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम देऊ शकते.
होळीमध्ये नोटा ओल्या झाल्यास त्या थेट उन्हात न वाळवता सावलीत सुकवाव्यात. त्यामुळे कागद खराब होण्याची शक्यता कमी होते.