Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Heart attack chest pain: छातीत दुखणं हे नेहमीच हार्ट अटॅकचं लक्षण असतं असं नाही. कधी कधी गॅसमुळेही छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. गॅस आणि हार्ट अटॅकच्या वेदनांमधील फरक काय आहे हे जाणून घेऊया.
Gas pain vs heart attack
Gas pain vs heart attackSAAM TV
Published On

छातीत दुखलं तर पहिल्यांदा आपल्याला हार्ट अटॅकची शंका वाटण्यापूर्वी गॅसेसचा त्रास वाटतो. मात्र कधी कधी छातीत दुखणं हे गॅस आणि कधी हार्ट अटॅकचंही लक्षणं असतं. त्यामुळे या वेदनेला दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अनेकदा लोकांना थोडीशी वेदना झाली की, ते ती गॅसमुळे झाली असं समजतात आणि त्याला हलक्यात घेतात.

छातीत दुखायला लागलं की, अनेकांना लगेच हार्ट अटॅकची भीती वाटते. मात्र प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकचं असतो असं नाही. पोटात किंवा आतड्यांमध्ये अडकलेला गॅसही छातीत तीव्र वेदना निर्माण करू शकतो. अनेकदा या वेदना इतकी तीव्र असतात की ती हार्ट अटॅकसारखीच वाटू शकते.

Gas pain vs heart attack
Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

घाईघाईने खाणं, खूप मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणं आणि कार्बोनेटेड पेयांचं जास्त प्रमाणात सेवन करणं यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

डॉ. संजय द्विवेदी सांगतात की, छातीत होणाऱ्या वेदना गॅसमुळेही असू शकतात किंवा हार्ट अटॅकचं लक्षण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वेदनेकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं. अनेक लोक सौम्य वेदना झाली की, ती गॅस आहे असं समजून दुर्लक्ष करतात. मात्र गॅसची वेदना आणि हार्ट अटॅक यातील फरक ओळखणं खूप गरजेचं आहे.

गॅसची वेदना की हार्ट अटॅक?

गॅसमुळे होणारी वेदना

ही वेदना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे. पोटात किंवा आतड्यांमध्ये हवा अडकली की ही वेदना निर्माण होतात. ही वेदना वरच्या पोटापासून छातीपर्यंत जाणवू शकते. त्याचसोबत पोट फुगल्यासारखं वाटणं, ढेकर येणं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटणं अशी लक्षणंही दिसू शकतात. या वेदनेतील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे ढेकर आल्यावर, गॅस शरीराबाहेर पडल्यावर वेदना कमी होऊ शकते.

हार्ट अटॅकमुळे होणारी वेदना

हार्ट अटॅक ही एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊन त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे छातीत दाब, जड वाटणं किंवा घट्ट पकडल्यासारखं वाटू शकतं. ही अस्वस्थता अनेकदा डाव्या हातात, जबड्यात, मानेत, पाठीमध्ये किंवा खांद्यातही पसरू शकते. यासोबत घाम येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं आणि मळमळ अशी लक्षणं दिसू शकतात. हार्ट अटॅकची वेदना विश्रांती घेतल्यानेही कमी होत नाही.

Gas pain vs heart attack
Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

गॅसच्या वेदना हार्ट अटॅकसारख्या का वाटतात?

डॉ. संजय यांनी सांगितलं की, आपल्या आतड्यांमधून आणि हृदयातून जाणाऱ्या काही नसांचा संपर्क मेंदूतील एकाच भागाशी असतो. त्यामुळे पोटाच्या डाव्या बाजूला गॅस झाला की तो डायफ्रॅमवर दाब निर्माण करतो. या दाबामुळे छातीत वेदना जाणवते आणि ती हार्ट अटॅकसारखी वाटू शकते.

Gas pain vs heart attack
Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com