ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिओकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत, जे वेगवेगळे फायदे आणि किंमतींसह येतात.
जिओचा एक अतिशय खास रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये युजर्सना अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे मिळणार आहेत.
Jioच्या या प्रीपेड रिचार्जची एकूण किंमत १७४८ रुपये आहे. कमी किंमतीत हा रिचार्ज उपलब्ध आहे.
Jio च्या ग्राहकांना तब्बल ३३६ दिवस हा प्लान वापरता येणार आहे. या रिचार्जचा कालावधी १ वर्षा पेक्षा थोडा कमी आहे.
तसेच Jio च्या या प्लानमध्ये युजर्सना रोमिंगसह अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत.
Jio च्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना कॉलिंग बरोबरच 3600 एसएमएसची सुविधा मिळणार आहे.
Jioचा हा १७७८ रुपयांचा रिचार्ज प्लान डेटा देणार नसून, हा फक्त कॉलिंग रिचार्ज प्लान आहे.
जिओचा १७४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त कॉलिंगची सुविधा हवी असेल.
जिओचा १७४८ रुपयांचा रिचार्ज प्लान अधिकृत जिओ पोर्टल किंवा जिओ अॅपवर उपलब्ध आहे.