Dr Shirish valsangkar : सोलापूरच्या डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट; चौकशीत महत्वाची माहिती उघड, आरोपी महिला गोत्यात?

Dr Shirish valsangkar update : सोलापूरच्या डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील चौकशीत महत्वाची माहिती उघड झाली आहे.
Dr Shirish valsangkar News
Dr Shirish valsangkarSaam tv
Published On

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचे नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आरोपी मनीषा माने पोलीस कोठडीत आहे. या मनिषामुळे डॉ. वळसंगकर यांनी आयुष्य संपवल्याचा उल्लेख त्यांच्या शेवटच्या चिठ्ठीत आहे. नव्या माहितीमुळे आरोपी मनीषा मानेच्या अडचणीत भर पडली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात आरोपी मनिषा मानेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची लवकरच दुसरी बाजू उलगडणार आहे. या आरोपी मनिषा मानेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.

कोणती माहिती झाली उघड?

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी मनिषा मानेला पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते. मनिषा मानेची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते. आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना धमकीचा मेल पाठवला होता. त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यासाठी आरोपी मनिषाला आणल्याची माहिती मिळत आहे. या चौकशीदरम्यान मोठी माहिती समोर आली आहे.

Dr Shirish valsangkar News
Pahalgam terror attack : मुस्लीम असल्याची लाज वाटतेय; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावर गायक मनातलं बोलून गेला

शेवटच्या चिठ्ठीत डॉ. वळसंगकरांनी कुणावर केला आरोप?

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शेवटच्या चिठ्ठीत मनिषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे.

Dr Shirish valsangkar News
Actress Viral Video : प्रायव्हेट क्षणांचा व्हिडिओ बनवून केला व्हायरल; अभिनेत्रीचा संताप अनावर, म्हणाली...

मुलगा - सुनेने काय जबाब दिला?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मुलगा आणि सुनेने पोलिसांनी जबाब नोंदवला. डॉ. वळसंगकरांनी काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलची सुत्रे मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार आरोपी मनीषा मुसळे-मानेकडे होती. तिच्याकडे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून पद होते.

हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभाराचा ताण मुलगा आणि सुनेवर वाढला होता. त्यामुळे २०२५ साली डॉ. वळसंगकरांनी पुन्हा हॉस्पिटलची सुत्रे त्यांच्याकडे घेतली. त्यावेळी मनिषाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी वळसंगकरांकडे आल्या होत्या.

Dr Shirish valsangkar News
Navi Mumbai AC bus incident : धावत्या एसी बसमध्ये शारीरिक संबंध ठेवणे भोवले; पोलिसांकडून प्रेमी युगुलावर मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com