Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai News : मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए दरम्यानची ई वॉटर टॅक्सी सेवा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.यामुळे हा प्रवास एकतासाऐवजी फक्त ४० मिनिटांत होणार आहे.

Alisha Khedekar

  • गेटवे ते जेएनपीए ई वॉटर टॅक्सी सेवा २२ सप्टेंबरपासून सुरू.

  • प्रवासाचा वेळ एक तासांवरून फक्त ४० मिनिटांवर येणार.

  • पहिल्या टप्प्यात दोन बोटी – सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित.

  • परवडणारा भाडे दर आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची नवी क्रांती.

मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. येत्या २२ सप्टेंबर पासून गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे आणि जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा हा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

सध्या गेटवे ते जेएनपीए या मार्गावर लाकडी बोटींद्वारे प्रवास केला जातो. मात्र या बोटी जुन्या झाल्याने त्यातून प्रवास करताना सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित होतात. त्याशिवाय प्रवासासाठी लागणारा वेळही किमान एक तास असतो आणि कधीकधी हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे हा प्रवास आणखी लांबतो. या पार्श्वभूमीवर जेएनपीएने आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय शोधत ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ एक तासांवरून फक्त ४० मिनिटांवर येणार आहे.

प्रारंभी या वॉटर टॅक्सी परदेशात तयार करण्याचा विचार होता, मात्र नंतर ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत त्यांची निर्मिती देशातच करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम सोपविण्यात आले आणि काही तांत्रिक कारणांमुळे झालेला विलंब संपवून अखेर या बोटी आता सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, मुंबईकरांसाठी ही सेवा एक नवे पर्व ठरणार असल्याचे सांगितले.

प्रथम टप्प्यात दोन ई वॉटर टॅक्सी सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी एक सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असेल. प्रत्येकी २० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बोटी ताशी प्रवास जलद आणि सोयीस्कर करतील. यासाठी अपेक्षित प्रवासी दरही अगदी परवडणारा म्हणजे सुमारे १०० रुपये असणार आहे. या टॅक्सींच्या देखभाल आणि संचलनाची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपविण्यात आली आहे.

भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी सांगितले की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होऊन पहिल्याच दिवशी प्रवाशांना सेवा मिळेल. पुढील टप्प्यात आणखी चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा एक नवा आदर्श निर्माण होईल.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहतुकीची समस्या ही कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. विशेषतः गेटवे ते जेएनपीए या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करतात. ई वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास या सर्वांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ होईल. प्रवाशांसोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही या सेवेला मोठी मागणी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अखेर मुंबईकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून, २२ सप्टेंबरनंतर समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही नवी ई वॉटर टॅक्सी एक वेगळा आणि आधुनिक अनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT