Mumbai-Bhayander water taxi : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई-भाईंदर वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार; कसा असेल जलमार्ग?

मुंबई शहराच्या आसपासच्या भागांना जोडण्याची सुरू झाली आहे. याच योजनेंतर्गत मुंबई शहरात अनेक योजना राबविण्यात येत आहे.
file photo
file photoSaam TV
Published On

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराच्या आसपासच्या भागांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. याच योजनेंतर्गत मुंबई शहरात अनेक योजना राबविण्यात येत आहे. एमएमआरडीए सध्या ४३ किलोमीटर लांब वर्सोवा-विरार सी-लिंक प्रकल्पावर काम करत आहे. याच दरम्यान मुंबईच्या मिरा-भाईंदर जवळ राहण्याऱ्या लोकांसाठी खूशखबर समोर आली आहे. (Latest Marathi News)

आमदार गीता जैन यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी मुंबई (Mumbai) ते मीरा-भाईंदर (Bhayandar) वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. अमित सैनी यांच्यासोबत शुक्रवारी मिरा-भाईंगर पालिकेत इंजिनिअर दीपक खंबित आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

file photo
Konkan Politics : कोकणात तरुण नेत्याचा ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा धक्का; ६ माजी नगरसेवक शिंदे गटात

आमदार गीता जैन यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी माझी मागणी लक्षपूर्वक ऐकली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना भाईंदर आणि बांद्रा सी लिंक दरम्यान प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या मागणीवर काम करण्याचे निर्देश दिले. गीता जैन यांच्या म्हणण्यानुसार आठ महिन्यांच्या आत वॉटर टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

file photo
Dhananjay Munde : मंत्रालयातील बोगस लिपिक भरती प्रकरणावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया; केला महत्वाचा खुलासा

मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा

दरम्यान, उद्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा चार फेब्रुवारीपासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेस प्रारंभ झाला. मुंबई बंदर प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) नयनतारा शिपिंग कंपनीला (Nayantara Shipping Company) प्रवासी सेवा चालवण्यास मान्यता दिली आहे.

नयन इलेव्हन या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर एकशे चाळीस प्रवासी प्रवास करू शकतात. या प्रवाशांसाठी दाेनशे पन्नास रुपये तिकीट दर आहे. तसेच बिझनेस क्लासमधून साठ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये तिकीट दर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com