जितेश कोळी, रत्नागिरी
Konkan Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोकणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासह काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिपळूणमधील सहा माजी नगरसेवकांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Political News)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करताना माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवू तसेच चिपळूनच्या विकासकामाला गती देऊ, असे आश्वासन या माजी नगरसेवकांना दिले. (Latest Marathi News)
काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, स्वाती दांडेकर, संजीवनी शिगवण. हारून घारे आणि संजीवनी घेवडेकर, अशी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची नावे आहेत.
आमदार योगेश कदम यांचे समर्थक उद्योजक नासीर खोत यांच्या माध्यमातून माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे चार तर ठाकरे गटाचे दोन असे सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चिपळूण मधील उर्वरित गाळ काढण्यासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिलं. तसेच उद्योजक नासीर खोत यांच्यावर लवकरच मोठी जबादारी देणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांचे विशेष कौतुक केले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.