Mumbai Voter List Scam  Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election: दुबार-तिबार नाही, तर ४ मतदारांची १०३ वेळा नावं, मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ उघड

Mumbai Voter List Scam: मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ मुंबईत उघड झाला आहे. मुंबईत फक्त दुबार तिबार नाही तर ४ जणांची १०३ वेळा मतदार यादीत नावं आहेत. याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Priya More

Summary -

  • मुंबईत मतदार यादीतील सर्वात मोठा घोळ उघड झाला आहे

  • मुंबईत फक्त दुबार आणि तिबार मतदार नाहीत

  • तर ४ जणांची १०३ वेळा नावं मतदारयादीत आढळून आली आहेत

विकास मिरगणे, मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबार अन् तिबार नव्हे तर १०३ बार ४ व्यक्तींची नाव आली आहे. मुंबईत तब्बल ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत.

मुंबईमध्ये ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्याने अशा डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांवर पोहचली आहेत. मात्र या दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर काम केले जाणार आहे.

वार्डमध्ये दुबार मतदार आहे की नाही? हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्डमध्ये अधिकारी आणि कर्मचारी पाहणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत पालिकेचे कर्मचारी, बीएलओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत. सध्या १० डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट १ भरून घेतले जाणार नाही. मतदान केंद्र निहाय यादी २२ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. संभाव्य दुबार मतदारांची यादी समोर येत आहे. या दुबार मतदारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. तर मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्याच्या हालचालींना देखील वेग आला आहे. तसंच राज्य निवडणूक आयोगाकडून संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा असा असे आदेश दिले आहे. दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदार संघात मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

SCROLL FOR NEXT