Election : जानेवारीत गोंधळ,फेब्रुवारीत दहावी-बारावीच्या परीक्षा, BMC च्या निवडणुका कधी होणार? महत्त्वाची माहिती समोर

BMC election date : बीएमसी निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षा आणि आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणूक कार्यक्रम ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
BMC News
Mumbai NewsSaam Tv
Published On

Will BMC elections be held before SSC and HSC exams in 2026? : आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधी होणार? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारी २०२६ च्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण NBT च्या वृत्तानुसार, राज्य आयोगाकडून बीएमसी निवडणुकीसाठी आणखी वेळ वाढवून मागण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात बारावी आणि दहावीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुका होणं शक्य वाटत नाही. त्यामुळे जानेवारीच्या अखेरपर्यंतच निवडणुका घेण्याबाबत आयोगाकडून पडताळणी सुरू आहे. राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुकीला ब्रेक लागला होता. पण सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत कडक निर्देश दिले. त्यानंतर राज्यातील निवडणुकीला पुन्हा एकदा वेग आला आहे. ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असेल, तिथे निवडणुका कोणत्याही क्षणी घेतल्या जाऊ शकतात. पण, कायदेशीर प्रक्रियामुळे निवडणूक कार्यक्रमाला २ आठवड्याचा लेट मार्क लागलाय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीबाबत संभ्रम तयार झालाय. दोन्ही निवडणुका जानेवारीमध्येच होणार का? असा गोंधळ राजकीय वर्तुळात उडाला आहे.

BMC News
Local Body Election : नगर परिषद, नगरपंचायत प्रचाराचा आज शेवटचा दिवस, रात्री १० वाजता तोफा थंडावणार

महानगरपालिकेची मतदार यादीचे शेड्युल जारी करण्यात आले आहे. वॉर्डानुसार मतदान यादी २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता २० जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका उशीरा होण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबरच्या आधी मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे. त्यात जिल्हा परिषदेतील आरक्षणाचाही मुद्दा आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

BMC News
Shahajibapu Patil : शिंदेसेना-भाजप वाद चिघळणार? शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या कार्यालयावर छापा, जाहीर सभेनंतर आयोगाची धडक कारवाई

दहावी-बारावी परीक्षाच्या आधी निवडणुका ?

फेब्रुवारी २०२६ पासून राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून जानेवारी २०२६ च्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर निवडणुका घेण्यात आल्या तर त्या एप्रिलच्या अखेरीस जाऊ शकतात. त्यामुळे आयोगाकडून मनपाच्या निवडणुका जानेवारीमध्ये घेण्याबाबत विचार करत आहेत. फार फार तर फेब्रुवारीच्या १० तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचा वेळ आयोगाकडून कोर्टात मागितला जाऊ शकतो. कोर्टाने आयोगाला दोन आठवड्याचा वेळ दिल्यास मनपा निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहेत. याबाबत आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रसारमाध्यमांना दुजोरा दिलाय.

BMC News
Pune Accident : पुण्यात आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com