Shahajibapu Patil : शिंदेसेना-भाजप वाद चिघळणार? शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या कार्यालयावर छापा, जाहीर सभेनंतर आयोगाची धडक कारवाई

Election Commission raid Shahajibapu Patil’s office in Sangola : शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोग आणि एलसीबी पथकाने रात्री उशिरा छापेमारी केली. या कारवाईमुळे भाजप-शिंदेसेना वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून, सांगोला परिसरात राजकीय खळबळ उडाली आहे.
Election Commission raid Shahajibapu Patil’s office in Sangola
Sangola Politics Heat UpSaam
Published On

Solapur Sangola Local body Election News : नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रचारावेळी महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आले. शिंदेतसेना आणि भाजप यांच्य वादाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले. भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसेच आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजाबापू पाटील यांच्या कार्यलयावर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा छापामारी केली. पाटील यांची जाहीर सभा संपताच आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांनी दिले आहे. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निकटवर्तीयांवरही कारवाई झाल्याची सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान कार्यालयाची झाडा जडती घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी कार्यालयातील उपस्थितांना बाहेर जाण्यास मज्जाव केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. या कारवाईचे नेमके कारण आणि पुढील तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Election Commission raid Shahajibapu Patil’s office in Sangola
Local Body Election : नगर परिषद, नगरपंचायत प्रचाराचा आज शेवटचा दिवस, रात्री १० वाजता तोफा थंडावणार

मागील काही दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपवर त्यांनी टीकेचा बाण सोडला होता. आता त्यात प्रचाराच्या तोफा काही तासांत थंडावणार होत्या, पण त्याआधी सांगोल्यात शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावर आणि जवळच्या व्यक्तींच्या घरावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यामुळे आता शिंदेंसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणि चिघळण्याची शक्यता वर्तवली जातेय. छापेमारीत काय सापडलं, काही जप्त करण्यात आले का, याची माहिती समोर आली नाही.

Election Commission raid Shahajibapu Patil’s office in Sangola
Horoscope Today : सोमवारचा दिवस ४ राशींसाठी ठरणार भाग्याचा; ८ राशींचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारावेळी शिंदेंच्या शिवसेनेची अनेक ठिकाणी कोंडी झाल्याचे चित्र आहे. सोलापूरमधील सांगोलाही याला अपवाद राहिला नाही. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आघाडी केली. मंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकाप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र आणलं. भाजपने कोंडी केल्याने शहाजी बापू पाटील चांगलेच नाराज झाले होते, त्यांनी टीकेचा बाण सोडला होता.

Election Commission raid Shahajibapu Patil’s office in Sangola
Local Body Election : मोठी बातमी! २० तारखेला मतदान, २१ ला मतमोजणी, आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com