Sakshi Sunil Jadhav
पुरुष हा घरातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती मानला जातो. दिवसरात्र मेहनत करुन त्यांना कुटुंब सांभाळायचं असतं.
बऱ्याचदा पुरुष कामात इतके व्यस्त असतात की, त्यांना जाणवणारी दुखणी ते सहज दुर्लक्षित करतात. त्यामुळे कमी वयातच त्यांना काही गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.
वयाच्या चाळिशीतच पुरुषांना अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण त्यांच्यामध्ये या वयात हार्मोनल बदल होत असतात, कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असतात.
पुरुषांना त्यामुळेच पुढील चार गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध राहिलं पाहिजे आणि योग्य तपासण्या केल्या पाहिजेत.
चाळिशीतल्या पुरुषांना प्रोस्टेटच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना लघवी करताना त्रास होतो. जर यावर उपचार केले नाहीत तर किडनीवर परिणाम होतो.
चाळिशीतल्या पुरुषांना ह्रदयाशी संबंधित दुखणी म्हणजे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि धुम्रपान अशा हार्ट अटॅक संबंधित आजारांना सामोरं जावं लागतं.
डायबिटीजचा धोका पुरुषांच्या चुकीच्या आणि गोड खाण्याच्या सवयीने वाढतो. त्याने सतत लघवीचा त्रास, तहान आणि थकवा जाणवतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.