Shirur MlA Mauli Katke : शिरूरमध्ये आजी-माजी आमदार भिडले, मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

Pune Shirur MLA Mauli Katake : शिरूरमध्ये मतदान केंद्राबाहेर आमदार माऊली कटके व अशोक पवार यांचा शाब्दिक वाद निर्माण झाला. या वेळेस दोन गट एकमेकांसमोर येऊन भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून शांतता राखण्याचे आवाहन केले.
Shirur MlA Mauli Katke
Pune ShirurSaam Tv
Published On
Summary
  • शिरूरमध्ये मतदान केंद्राबाहेर दोन आमदारांमध्ये वाद

  • दोन गट आपापसात भिडले

  • मतदानादरम्यान राजकीय तणाव निर्माण झाला

  • पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगवला

सागर आव्हाड, पुणे

शिरूर मध्ये दोन दिवसांपूर्वीच आमदार माऊली कटके यांच्या गाडीने एका चिमुकलेला उडवलं होतं त्यानंतर आमदार अशोक पवार आक्रमक झाले होते. त्यानंतर काल शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरून ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व अशोक पवार या आजी - माजी आमदारांत शाब्दिक बाचाबाची झाली. बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी आमदार एकमेकांना भिडले. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविल्यानंतर शांततेचे आवाहन करीत हे आजी - माजी आमदार निघून गेले.

आमदार कटके यांनी शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची तसेच मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी ते काही मतदान केंद्रात जाऊन माहिती घेत असल्याचे समजताच व ते उर्दू शाळेजवळील मतदान केंद्रात गेल्याचे आपल्या कार्यकर्त्यांकडून समजताच अशोक पवार यांनी या मतदान केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. आमदार कटके मतदान केंद्रातून बाहेर येताच पवार यांनी त्यांना या कृत्याचा जाब विचारला.

तुम्हाला कायद्याने मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण एक लोकप्रतिनिधी असून, तुम्हाला हे बेकायदा कृत्य करणे पटते का, प्रत्येक मतदान केंद्रात जावून पाहणी करणे योग्य आहे का, असा सवाल केला. त्यावर कटके यांनी आपण बाजूला या चर्चा करू, असे म्हणताच पवार यांनी तुम्ही आत का गेला याचे उत्तर द्या, असा तगादा लावत या घटनेचे व्हिडिओ चित्रण करा, असे कार्यकर्त्यांना सूचित केले.

Shirur MlA Mauli Katke
Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मतदान केंद्राधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना बोलवा, असे ते म्हटले. त्यावर तुम्ही चिडू नका, रागावू नका, हायपर होऊ नका, असे आमदार कटके म्हणाले. त्यावर आपण आमदार आहात, कायदा पाळा, नीट वागा असा सल्ला दिल्याने आमदार कटके काहीसे संतप्त झाले. पराभव दिसायला लागल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली का. काय सीसीटीव्ही चित्रण तपासा असे म्हणत ते निघून गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविल्यानंतर दोन्ही बाजूंना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com