Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra WeatherSaam Tv

Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update News : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Published on
Summary
  • उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी

  • पुढील काही दिवस राज्यभरात थंडी कायम राहण्याचा अंदाज

  • थंडीच्या लाटेमुळे अनेक भागांमध्ये पहाटे धुके, रात्री हुडहुडी

राज्यात पुन्हा उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने वातावरणात गारवा पसरत आहे. आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या सुरुवातीला राज्यात वातावरण थंडगार झालं आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम असून, काही ठिकाणी पहाटे धुकं पाहायला मिळत आहे. काल धुळे येथे नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड येथे ८.९ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ९.८ अंश, जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा येथे पारा १० अंश व त्यापेक्षा खाली आल्याने गारठा कायम आहे.

Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला

दरम्यान, काल सकाळपर्यंत २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे.

Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज
Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगालच्या उपसागरातील ‘डिटवाह’ चक्रीवादळच संकट निघून गेल्यानंतर त्याचे अवशेष असलेले तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ सक्रिय आहे. मात्र याचा फटका महाराष्ट्राला बसणार नसून राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com