Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Solapur Pannalal SuranaSaam Tv

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Barshi Pannalal Surana Passes Away : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सोलापूरसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on
Summary
  • पन्नालाल सुराणा हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित समाजवादी विचारवंत, पत्रकार व समाजसेवक होते

  • त्यांच्या आयुष्यात त्यांनी भूदान चळवळ, शेतकरी–शेतमजुर हक्क, शिक्षण व बेरोजगारी यांसारख्या सामाजिक विषयांवर काम केले

  • त्यांनी मराठवाडा दैनिकचे संपादक म्हणून पत्रकारितेतही महत्त्वपूर्ण योगदान दिले

  • त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शरीरदानाच्या निर्णयाने त्यांचा अंतिम निरोप अधिक मानवतावादी व आदर्श बनला आहे

सोलापूर मधून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी पन्नालाल सुराणा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

संपूर्ण आयुष्य समजासाठी देणाऱ्या साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधणानंतर त्यांचे पार्थिव शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ९ जुलै १९३३ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला होता. बार्शीत शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Land Scam News : अबब! पालघरमध्ये कोट्यवधींचा जमीन घोटाळा; ५५ एकर जागेमुळं पर्दाफाश

पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. तर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक म्हणून ते काम पाहत होते. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केलं आहे.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shocking : आई वडिलांसोबत शेतात गेलेली ४ वर्षीय चिमुकली परत आलीच नाही, बंधाऱ्यात सापडला मृतदेह; सांगलीत नेमकं काय घडलं?

समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची आणीबाणीत जेल भोगलेल्या समाजवादी नेते म्हणून देखील वेगळी ओळख आहे. जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

चले जाव आंदोलनपासानू ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्वाचा अनुभव सुराणा यांच्याकडे होता. मात्र त्यांच्या या अकाली निधनाच्या बातमीने सोलापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com