Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला

Maharashtra Nagar Parishad Live Voting : शिराळा नगरपंचायत मतदानासाठी मेलबॉर्न ते शिराळा असा प्रवास करत एका तरुणाने मतदानाचा हक्क बजावला. दीड लाखांचा खर्च करून केलेल्या या प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला
Election NewsSaam Tv
Published On
Summary
  • मेलबॉर्नमध्ये नोकरी करणारा तरुण मतदानासाठी शिराळ्यात दाखल

  • दीड लाख खर्च करून हजारो किमी प्रवास

  • मित्रांकडून जल्लोषात स्वागत आणि तहसीलदारांकडून सत्कार

  • लोकशाहीबद्दल जनजागृती करणारा प्रेरणादायी संदेश

विजय पाटील, सांगली

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मांडीला मांडी लावून बसणारे महायुतीतील नेते मंडळी स्थानिक पातळीवर मात्र आपल्याच विजयासाठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी अगदी शांततेत निवडणुका पार पडल्या आहेत. अशातच एका तरुण मतदाराने अगदी सात समुद्र पार करून ऑस्ट्रेलिया मधून येऊन शिराळा येथे मतदानाचा हक्क बजावला.

मूळचा महाराष्ट्राच्या मातीतला अन्सार कासिम मुल्ला हा तरुण ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला आहे. दोन डिसेंबर रोजी शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिराळामध्ये दाखल झाला. मतदानासाठी आपला मित्र आल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी फटाक्यांचं आतिषबाजी करत स्वागत केले. त्यानंतर अन्सारने मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला
Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी आयुक्त थेट रस्त्यावर उतरले, विमाननगरमध्ये घेतला आढावा

यानिमित्ताने शिराळा तहसीलदार शामला खोत यांनी त्यांचा सत्कार यावेळी केला. या तरुणाला मतदानाला येण्यासाठी मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया ते शिराळामध्ये येण्यासाठी दीड लाख रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आला असल्याचे त्याने सांगितले. एवढा खर्च करून फक्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत तरुण सांगलीच्या शिराळामध्ये दाखल झाला.

Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला
Accident : सहलीवरून येणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात, डिव्हायडरला धडकून गाडी उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळली अन्...

मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे.मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान आता या निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com