Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

350 Voters Missing From Mumbai Electoral: मुंबईतील वर्सोवा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ समोर आला आहे. साडेतीनशेहून अधिक मतदारांचे पत्ते चुकीचे, तर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
MNS workers highlighting errors in Mumbai’s voter list during a press conference in Versova.
MNS workers highlighting errors in Mumbai’s voter list during a press conference in Versova.Saam Tv
Published On
Summary

वर्सोवा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उघड.

साडेतीनशेहून अधिक मतदारांचे पत्ते चुकीचे आढळले.

एका घरात हिंदू, मुस्लिम, इतर धर्मीयांची नावे एकत्र नोंदवली गेली.

मनसेने निवडणूक आयोगाला तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिला.

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चारकोप नंतर आता वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.

मनसेचे वर्सोवा विभागाध्यक्ष संदेश देसाई यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, मतदार याद्यांमधील विसंगती पाहता निवडणूक आयोगाकडून तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. मनसैनिकांनी केलेल्या अभ्यासात यादी क्रमांक 268 मध्ये एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीय मतदारांची नावे नोंदवण्यात आल्याचं समोर आलं आहे.

MNS workers highlighting errors in Mumbai’s voter list during a press conference in Versova.
Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

याचबरोबर साडेतीनशेहून अधिक मतदारांच्या पत्त्यांचा ठिकाणाच नाही, अशी धक्कादायक बाबही मनसेकडून उघड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये नावे मराठी भाषेत असणे अपेक्षित असताना काही नावे बंगाली भाषेत आढळली आहेत. या सर्व गोंधळाबाबत मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली असून, याद्या तात्काळ दुरुस्त न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

MNS workers highlighting errors in Mumbai’s voter list during a press conference in Versova.
४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

मनसेने यापूर्वीही मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांतील चुका उघड करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता वर्सोव्यातील या नव्या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

MNS workers highlighting errors in Mumbai’s voter list during a press conference in Versova.
Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सातत्याने अनेक पुरावे सादर करत निवडणूक यादीतील घोळ दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षासह इतर घटक पक्षांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत राज ठाकरे यांनी आयोगावर तोफ डागली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुंबईसारख्या ठिकाणी मतदारयद्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com