Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Is Aaditya Thackeray The Next Mayor Of Mumbai: मुंबईत भाजपला शह देण्यासाठी ठाकरेसेनेनं नवी रणनीती आखलीय...ठाकरेसेनेनं महापौरपदासाठी मोठं ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय? हे ट्रम्प कार्ड नेमकं काय आहे? त्याची नेमकी रणनीती काय आहे?
Aaditya Thackeray’s name sparks speculation for Mumbai Mayor post amid rising political battle between Thackeray Sena and BJP.
Aaditya Thackeray’s name sparks speculation for Mumbai Mayor post amid rising political battle between Thackeray Sena and BJP.Saam Tv
Published On

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाजलयं.मात्र महापालिका निवडणुकांसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे.अशातच ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी रणनीती आखत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय.

मुंबई महापालिकेत ठाकरेसेनेची सत्ता आली तर आदित्य ठाकरे महापौर होणार अशी चर्चा रंगलीय...या चर्चेवर स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवण्याची संघात चर्चा सुरु असल्याचा खोचक टोला लगावलाय....

दुसरीकडे ठाकरेचं राजकारण पाहता मुंबईत त्यांचा महापौर झाला तरी खाऊगिरीची मानसिकता ते राबवणारचं, अशी टीका भाजपनं केलीय...आधीच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय....त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबतही जुळवून घेण्याचे प्रयत्न केलेत... तर दुसरीकडे मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूही एकत्र येणार आहेत... त्यामुळे हा लढा ठाकरे बंधू विरूद्ध भाजप असाच रंगणार असला तरी मुंबईचा महापौर नेमका कोण होणार? ठाकरे बंधू आणि भाजप निवडणुकीआधी महापौर पदाचा चेहरा जाहीर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com