Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

Chandrika Dixit Controversy: वडापाव गर्ल आणि बिग बॉस OTT 3 फेम चंद्रिका दीक्षितच्या वक्तव्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. मुलाच्या संगोपनाबद्दल केलेल्या तिच्या धक्कादायक वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Chandrika Dixit Controversy
Chandrika Dixit ControversySaam Tv
Published On

Chandrika Dixit Controversy: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस OTT 3 फेम चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीतील तिचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून, त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता मिळाली. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यानंतर ती अचानक प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस OTT 3’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि पतीसोबतच्या वादामुळेही चर्चेत आहे.

दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये मुलाच्या संगोपनाबद्दल बोलताना चंद्रिकाने केलेलं विधान सध्या वादाचं कारण ठरत आहे. मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं की, आई होण्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. जर मला माझ्या मुलाचे संगोपन करण्यासाठी कुणासोबत झोपावे लागले तरीही, मी ते करेन.. पण मी माझ्या मुलाला वाढवणारच', असं ती म्हणाली.

Chandrika Dixit Controversy
Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहीले, मुलाचे संगोपन करण्यासाठी तुझ्या पहिलं मनात हे काम आलं? आणखी एकाने कमेंट केली सिंपथीच्या नावावर काहीही बोलू नको. तर अनेकांनी तिला ट्रोल करत मेहनत करून पैसे कमवण्याचा सल्लाही दिला.

चंद्रिका दीक्षित सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. तिच्या पती युगम गेरासोबत तिचं नातं ठिक नसल्याच्या चर्चा सुरू असून, ती पुन्हा लग्न करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत तिचं हे वक्तव्य आणखी चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून, चंद्रिका दीक्षितच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com