Shruti Vilas Kadam
मेकअप करताना चेहऱ्यावर मेकअप नीट दिसावा यासाठी वापरला जाणारा एक सोपा नियम म्हणजे 3-1-1 नियम. यामध्ये तीन बेस प्रॉडक्ट्स, एक हायलाइट आणि एक फोकस फीचर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
मेकअपचा बेस नीट दिसण्यासाठी फाउंडेशन, कंसीलर आणि कॉम्पॅक्ट किंवा पावडर असे तीन बेस प्रॉडक्ट्स वापरणे योग्य मानले जाते.
चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी हायलाइटर किंवा इल्यूमिनेटर वापरला जातो. यामुळे चेहऱ्यावरील हायलाइट पॉइंट्स अधिक उठून दिसतात.
3-1-1 नियमात मेकअप करताना एकाच फीचरवर जास्त फोकस ठेवण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, डोळे किंवा ओठ यापैकी एकाला अधिक आकर्षक बनवणे.
या नियमामुळे मेकअप जास्त जड किंवा ओव्हर वाटत नाही. चेहरा नैसर्गिक आणि एलिगंट दिसण्यास मदत होते
मेकअपची सुरुवात करणाऱ्यांसाठी 3-1-1 नियम खूप उपयुक्त आहे. यामुळे कमी प्रॉडक्ट्समध्येही सुंदर आणि प्रोफेशनल लूक मिळू शकतो.
ऑफिस, पार्टी किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा नियम वापरल्यास मेकअप व्यवस्थित आणि आकर्षक दिसतो.